सायकलफेरीतून ज्येष्ठ नागरिकांना सलाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकलफेरीतून ज्येष्ठ नागरिकांना सलाम
सायकलफेरीतून ज्येष्ठ नागरिकांना सलाम

सायकलफेरीतून ज्येष्ठ नागरिकांना सलाम

sakal_logo
By

rat२३७.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२३p२०.jpg ः
७७७११
दापोली ः सायकल फेरीत सहभागी झालेले दापोलीकर.
---

सायकलफेरीतून ज्येष्ठ नागरिकांना सलाम

दापोलीतील उपक्रम ; वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट

दाभोळ, ता. २३ ः वृद्ध व्यक्तींची ज्येष्ठता व प्रदीर्घ अनुभव हा उपयुक्त गुण मानला जातो. या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ दापोली सायकलिंग क्लब आणि दी फर्न समाली रिसॉर्टतर्फे सायकलफेरी काढण्यात आली. या फेरीत दापोलीतील गणेश दातार वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची भेट घेण्यात आली.

आझाद मैदानातून सुरू झालेली सायकलफेरी केळसकर नाका-बुरोंडीनाका- फॅमिली माळ-गणेश दातार वृद्धाश्रम-नटराजनाका- आझाद मैदान अशा ५ किमी मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. दातार वृद्धाश्रमामध्ये व्यवस्थापक रवींद्र इंगळे यांनी तेथील कार्याबद्दल माहिती सांगितली. या वेळेला ज्येष्ठ नागरिक संस्थेचे राजाराम मढव, सुरेश गुरव, प्रेमानंद महांकाळ आणि सहकारी उपस्थित होते. त्यांनी आजी-आजोबा, नातवंडे नात्याबद्दल माहिती दिली. विभागस्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले विद्यार्थी यश शिर्के, स्नेहा भाटकर, संचिता भाटकर, सर्वेश बागकर, साईप्रसाद वराडकर, खानविलकर, हर्ष लिंगावळे यांचा गौरव करण्यात आला. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकलविषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--