-दापोलीत शानदार दिंडीने जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-दापोलीत शानदार दिंडीने जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
-दापोलीत शानदार दिंडीने जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

-दापोलीत शानदार दिंडीने जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

sakal_logo
By

rat२३४१.txt

(पान २ साठी)

दापोलीत दिंडीने विज्ञान प्रदर्शनाची सुरवात

गावतळे, ता. २३ ः जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन दापोलीतील ए. जी. हायस्कूल येथे सकाळी ९ वाजता शानदार दिंडीने झाले. गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, शिक्षण संस्थेचे सचिव सौरभ बोडस, स्कूल कमिटी अध्यक्ष रवींद्र कालेकर, मुख्याध्यापक सतीश जोशी, विज्ञान वारकरी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकांनी सहभाग घेतला. लेझीम, ग्रंथपालखी नाचवत शहरातून दिंडी काढली.
श्रीराम माजलेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, बीडीओ आर. एम. दिघे, अण्णासाहेब बळवंतराव, संस्थेचे पदाधिकारी डॉ. करमरकर, सौरभ बोडस यांच्या उपस्थितीत विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. सौरभ बोडस यांनी भारतीय विज्ञानातील रहस्य उलगडले, तर इतिहास, परंपरा ही अशी गोष्ट आहे की ती विकत घेता येत नाही असे ए. जी. हायस्कूलचे श्री. महाजन यांनी सांगितले. विज्ञान जसे वरदान आहे तसे शापही असून मोबाईलचा वापर मर्यादित करावा. तसेच जुने ते सोने याप्रमाणे माती, तांबे, पितळ आणि लोखंडी भांडी वापरून आपले आरोग्य चांगले राखले जाईल. त्याचबरोबर विज्ञानाचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठीच होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी सांगितले.
--