राजापूरराजापूर अर्बनमध्ये परिवर्तन निश्चित होईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूरराजापूर अर्बनमध्ये परिवर्तन निश्चित होईल
राजापूरराजापूर अर्बनमध्ये परिवर्तन निश्चित होईल

राजापूरराजापूर अर्बनमध्ये परिवर्तन निश्चित होईल

sakal_logo
By

राजापूर अर्बनमध्ये
परिवर्तन निश्चित होईल
आमदार राजन साळवी ; सहकार पॅनेलबाबत सभासदांमध्ये नाराजी
राजापूर, ता. २३ः राजापूर अर्बन बँकेच्या संचालक मंडळामध्ये सभासदांना परिवर्तन अपेक्षित असून परिवर्तन पॅनेलला सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बँकेच्या या निवडणुकीमध्ये निश्‍चितच परिवर्तन पॅनेल विजयी होईल, असा विश्‍वास आमदार राजन साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. विद्यमान संचालक मंडळ असलेल्या सहकार पॅनेलच्या कारभाराबाबत सभासदांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.
राजापूर अर्बन बँकेची निवडणूक होत असून यामध्ये परिवर्तन पॅनेल रिंगणामध्ये उतरले आहे. या पॅनेलचा प्रचार आणि निवडणुकीतील पॅनेलचा अजेंडा या विषयी आमदार साळवी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, शहरप्रमुख संजय पवार यांच्यासह परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार साळवी म्हणाले, सहकार पॅनेलच्या कारभाराविषयी सभासदांमध्ये तीव्र नाराजी आहे. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्‍वर आणि अन्य तालुक्यांसह बाहेरील सभासदांशी प्रचारादरम्यान संपर्क साधला असता ही नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. सद्यःस्थितीमध्ये बॅंकेमध्ये परिवर्तनाची आवश्यकता असून त्यामुळे सभासदांकडून परिवर्तन पॅनेलला प्रचारादरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये निश्‍चितच परिवर्तन पॅनेलचा विजय होणार आहे. परिवर्तन पॅनेलमध्ये सहकाराविषयी आणि बँकेच्या कारभाराविषयी जाण वा माहिती असलेले उमेदवारांचा समावेश असल्याने बँकेचा कारभार हाकताना कोणतीही अडचण येणार नाही.