वातानुकूलित रंगमंचावर राज्य संगीत नाट्य स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वातानुकूलित रंगमंचावर राज्य संगीत नाट्य स्पर्धा
वातानुकूलित रंगमंचावर राज्य संगीत नाट्य स्पर्धा

वातानुकूलित रंगमंचावर राज्य संगीत नाट्य स्पर्धा

sakal_logo
By

वातानुकूलित रंगमंचावर
राज्य संगीत नाट्य स्पर्धा
संगीत मत्स्यगंधाने आज उदघाटन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ः महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केलेली ६१ वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा उद्या २४ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरीत रंगणार आहे. यावर्षी प्रथमच ही स्पर्धा वातानुकूलित सेवेत होणार आहे.
भरजरी वेशभूषा आणि प्रकाशयोजना, नाट्यगृहामधील वातावरणामुळे अनेक कलाकारांना संगीत नाटक सादर करताना होणारा त्रास लक्षात घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे यावर्षीही स्पर्धा वातानुकूलित यंत्रणेत होणार आहे. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पावणेसहा वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, ज्येष्ठ रंगकर्मी परशुराम केळकर, परीक्षक मुकुंद मराठे, धनंजय पुराणिक, मेधा गोगटे - जोगळेकर, रवींद्र कुलकर्णी, भवानी शंकर तथा संजय गोगटे आदी उपस्थित रहाणार आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत गोवा राज्यासह पुणे, मुंबई, नागपूर, रत्नागिरी येथील २३ संगीत नाटकांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.