
माणगावमधील अपघातानंतर जिल्हा पोलिसदल सतर्क
rat२३३२.txt
बातमी क्र.. ३२ (पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat२३p१६.jpg-
७७६८८
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी महामार्गाच्या भागधारक कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन महत्वाच्या सूचना केल्या.
---
माणगाव अपघाताने जिल्हा पोलिसदल सतर्क
महामार्ग काम करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींची बैठक; फलक, दिवे लावण्याच्या सूचना
रत्नागिरी, ता. २३ ः रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील टेपोली येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसदलदेखील सतर्क झाले आहे. जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. भविष्यात या मार्गावरील असे भीषण अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग संबंधित सर्व भागधारक कंपनीच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये कंपनीला महत्वाच्या ठिकाणी फलक लावणे, संकेतदर्शक बसवणे, परावर्तक आणि चेतावणी दर्शक दिवे लावण्याच्या सूचना केल्या. त्याचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा कुलकर्णी यांनी दिला.
महामार्गावरील भीषण अपघात रोखण्याच्यादृष्टीने जिल्हा पोलिसांनी उचललेल्या या पावलाबद्दल सर्वांकडून समाधन व्यक्त करण्यात येत आहे. १९ जानेवारीला रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील टेपोली भीषण अपघाताची दुर्घटना घडली. भविष्यातील अशा घटना टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी तातडीची बैठक बोलावली. जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे मोठ्या प्रमाणात चौपदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात जिल्ह्यातदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजना यासाठी ही बैठक घेतली. या बैठकीला मुंबई-गोवा महामार्ग संबंधित सर्व भागधारक कंपनींच्या प्रतिनिधींची व सर्व संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते. कुलकर्णी यांनी कामाचा आढावा घेऊन अपघात टाळण्याच्या अनुषंगाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग संबंधित सर्व भागधारक कंपनीच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले आणि सूचना करून उपाययोजना सुचवल्या. महामार्गावर योग्य व महत्वाच्या ठिकाणी फलक लावणे, त्यामध्ये पुढे काम चालू आहे, एकेरी मार्ग, पुढे वळण आहे आदी तसेच दिशा परिवर्तकांचा योग्यवेळी वापर करणे, संकेतदर्शक ( Blinkers) बसवणे, परावर्तक (Reflectors) व चेतावणी दर्शक दिवे (Warning Lights) बसवणे आदी सूचना केल्या. महामार्गावरील लावण्यात आलेले लोखंडी फलक चोरीला जाण्यापासून प्रतिबंध करण्याबाबतही शासकीय यंत्रणेस सूचित करण्यात आले.