
महागाई, बेरोजगारीविरोधात लढण्याचा निर्धार
rat२३३४.txt
(पान ३ साठी)
फोटो ओळी
-rat२३p३५.jpg-
७७८०७
रत्नागिरी ः हाथ से हात जोडो अभियान यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेस भुवन येथील बैठकीला उपस्थित पदाधिकारी.
---
महागाई, बेरोजगारीविरोधात लढण्याचा निर्धार
कॉंग्रेसची बैठक ; हाथ से हात जोडो अभियान
रत्नागिरी, ता. २३ : जिल्हा कॉंग्रेसने हाथ से हात जोडो अभियान यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेस भुवन येथे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या संदर्भातील महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, गॅस, पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किमती यासाठी पक्ष रस्त्यापासून ते संसदेपर्यंत प्रत्येक दिवशी या वाईट गोष्टी विरोधात लढेल, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला.
जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या हस्ते बैठकीच्या सुरवातीला काँग्रेसचा झेंडा फडकवला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी काँग्रेस भवन परिसर दणाणून गेला. बैठकीला प्रदेश काँग्रेसकडून समन्वयक ॲड. प्रवीण ठाकूर व रत्नागिरी निरीक्षक ॲड. गुलाबराव घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारत जोडो यात्रा भारतातल्या सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी होती. त्याची समाप्ती ३० जानेवारीला काश्मीरमध्ये होणार आहे. त्याची माहिती प्रत्येक घराघरात पोहचली पाहिजे. त्यासाठी काँग्रेसने हात जोडो याचा सिम्बॉल तयार केला असून त्याचे परिपत्रक तयार करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, माजी आमदार हुस्नाबानू खलिफे, अशोक जाधव, ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागोजागी अभियान फलक...
हाथ से हात जोडो या अभियानाचे फलक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात म्हणजे एसटी स्टँड, तहसील कार्यालय आणि मुख्य गर्दीच्या ठिकाणी लावण्याचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ठरविण्यात आले.
-----------