
तहसीलदारांना धक्काबुक्की; नऊ जणांना जामीन मंजूर
तहसीलदारांना धक्काबुक्की;
नऊ जणांना जामीन मंजूर
ओरोस, ता. २३ ः अनधिकृत वाळू वाहतूक सुरु असलेले डंपर रोखण्याचा प्रयत्न करताना मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील व त्यांच्या पथकाशी हुज्जत घालताना धक्काबुक्की केल्याबाबत न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व नऊही संशयितांना सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. जे. भारूका यांनी प्रत्येकी १५ हजाराचा सशर्थ जामीन मंजूर केला.
संशयितांतर्फे ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. याप्रकरणी रोहीत किशोर राजिवडेकर (कलमठ स्टेट बँक कॉलनी), निखिल लवू दळवी (वय २८, कसवण - सावंतवाडी), दयानंद दिनकर जाधव (वय २६, वागदे - बौद्धवाडी ), सुदाम दिगंबर तेली (वय ४३, बिडवाडी - मगरवाडी), संगमेश हनुमंत हलवर (वय २६, मूळ कलमठ - बाजारपेठ व सध्या रा. आशिये दत्तनगर), संतोष शिवाजी नलावडे (वय ३८, माईण - सडेवाडी), हुसेन इब्राहीम शेख (वय ४०, साकेडी मुस्लिमवाडी), अजय सदाशीव जाधव (वय ३०, मूळ नरडवे - भेरदेवाडी व सध्या रा. कणकवली - हुन्नरे चाळ), मिलिंद शामसुंदर तेली (वय ३३, बिडवाडी- मांगरवाडी) या सर्वांना न्यायालयाने सशर्थ जामीन मंजूर केला. ही घटना बिडवाडी- लाडवाडी येथे ६ जानेवारीला रात्री साडेबाराला घडली होती.