घोणसरी येथे आज गणेश जयंती उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोणसरी येथे आज 
गणेश जयंती उत्सव
घोणसरी येथे आज गणेश जयंती उत्सव

घोणसरी येथे आज गणेश जयंती उत्सव

sakal_logo
By

77960
घोणसरी ः येथील गणेशमूर्ती.

घोणसरीत आज
गणेश जयंती
तळेरे : घोणसरी (ता. कणकवली) येथील गणेश मंदिरात बुधवारी (ता. २५) माघी गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नेरूर येथील दशावतार नाट्यमंडळ यांचा ‘गर्व परिहार’ हा पौराणिक नाट्यप्रयोग होईल. बुधवारी दुपारी बाराला श्री गणेश जन्म, तीर्थप्रसाद, एकला महाप्रसाद, सायंकाळी सातला संगीत भजने सादर होतील. रात्री नऊला फुगडी होणार असून, त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव गणपती मंदिर ट्रस्ट, घोणसरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
................
77968
श्री पिंपळेश्वर गणपती

बांदा येथे आज
विविध कार्यक्रम
बांदा ः येथील श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात उद्या (ता. २५) माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. पहाटे पाचला काकड आरती, अभिषेक व पूजा, सकाळी साडेआठला श्री गणेश पूजा, ९ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १ वाजता महाआरती व महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ६.३० वाजता सायंआरती होईल, रात्री ८ वाजता सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा(ता. वेंगुर्ले) यांचा ‘वक्रतुंड’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाने केले.
--
78008
अंष्ट्ठसिद्धी गणेश मंदिर

माड्याचीवाडीत
आज कार्यक्रम
कुडाळ ः माड्याचीवाडी (खालचीवाडी) अंष्ट्ठसिद्धि गणेश मंदिरमध्ये माघी गणेश जयंती उत्सव उद्या (ता.२५) साजरा करण्यात येणार आहे. त्या दिवशी सकळी ९ वाजता गणेश पुजन, धार्मिक विधी, दुपारी आरती, महाप्रसाद आणि दुपारी ३.३० वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी सर्वं भाविक भक्त जनांनी उपस्थित राहुन या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास. माङयाचीवाडी यांनी केले आहे.
---

२२ ‘सीसीटीव्ही’
सावंतवाडीत मंजूर
सावंतवाडी ः शहरातील बंद असलेले सर्व सीसीटीव्ही पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत; तर नव्याने २२ ठिकाणी कॅमेरे लावण्यास परवानगी मिळाली. लवकरच हे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी आज येथे दिली. शहरातील सीसीटीव्ही बंद असल्याने तपासकामात अडचणी येत होत्या. मेंगडे यांनी कार्यभार स्वीकारल्यावर हे कॅमेरे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. सद्यस्थितीत शहरासह मुख्य चौकातील सर्व कॅमेरे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी आणखी २२ ठिकाणी सीसीटीव्हीस मंजुरी देण्यात आली आहे.