विकासासाठी शेतीला पर्याय नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासासाठी शेतीला पर्याय नाही
विकासासाठी शेतीला पर्याय नाही

विकासासाठी शेतीला पर्याय नाही

sakal_logo
By

77965
मातोंड : ज्ञानेश्वर केळजी यांचा सत्कार करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. शेजारी अतुल काळसेकर आदी.

विकासासाठी शेतीला पर्याय नाही

मनीष दळवी यांचे प्रतिपादन; मातोंड ग्रामस्थांतर्फे केळजी यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २३ ः जिल्हा बँकेमार्फत फक्त १ वर्षात दूध संकलन १३ हजार लिटरवरून ३० हजार लिटरपर्यंत गेले आहे. पुढच्या वर्षी ते ५० ते ६० हजार लिटरवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेती हे क्षेत्र त्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारी आतापासून केली पाहिजे. यासाठी लागणारी ताकद विकास संस्था, संघ व बँकेच्या माध्यमातून देऊ. सर्व यंत्रणा शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र यावे. नवीन पिढीला स्थिर करण्यासाठी शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीला तंत्रज्ञान व अभ्यासाची जोड दिल्यास जिल्ह्यात शेती क्षेत्राला नक्कीच चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी मातोंड येथे केले.
वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी मातोंड सोसायटी संचालक ज्ञानेश्वर केळजी यांची निवड झाल्याबद्दल मातोंड विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विविध संस्था, मंडळे, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दळवी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, मातोंड येथील ज्येष्ठ मार्गदर्शक हिरोजी उर्फ दादा परब, रमाकांत परब, उदय परब, मातोंड सोसायटी चेअरमन मकरंद प्रभू, सरपंच जानवी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पंचायत समिती माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, वजराठ सोसायटी चेअरमन वसंत पेडणेकर, तुळस सोसायटी चेअरमन संतोष शेटकर, तुळस उपसरपंच सचिन नाईक, अण्णा वजराटकर, तुळस माजी सरपंच शंकर घारे, विजय रेडकर यांच्यासह सोसायटी संचालक, संघ संचालक, विविध संस्था, मंडळे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा बँक उपाध्यक्ष काळसेकर यांनी, दळवी यांच्या काळात येथील खरेदी-विक्री संघ सक्षम होता. केळजी यांच्या रुपाने पुन्हा एकदा सक्षम नेतृत्व संघाला मिळाले आहे. सर्व विकास संस्थांची शिखर संस्था ही खरेदी-विक्री संघ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा संघ भरभराटीला येईल, असे सांगितले. प्रशासनातील निवृत्त झालेले हे व्यक्तिमत्व आपल्या बुद्धिमत्तेचा संघासाठी वापर करून संघाला एक नवीन भरारी देईल, असे सांगत डॉ. देवधर यांनी शेतकरी व उपस्थितांना शेती विषयावर मार्गदर्शन केले.
...............
चौकट
खरेदी-विक्री संघाला सहकार्यच
प्रत्येक कार्यकर्त्याने कशाप्रकारे जनतेसाठी काम करावे, हे केळजी यांच्याकडून शिकावे. त्यामुळे वेंगुर्ले खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर केळजी विराजमान झाल्याचे समाधान आहे. वेंगुर्ले संघ पुन्हा एकदा अव्वल करण्यासाठी आवश्यक पाठबळ संचालकांकडून दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी दळवी यांनी दिली.