सिंधुदुर्ग नगर रचना विभागाची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग नगर रचना विभागाची बाजी
सिंधुदुर्ग नगर रचना विभागाची बाजी

सिंधुदुर्ग नगर रचना विभागाची बाजी

sakal_logo
By

77966
सिंधुदुर्गनगरी : चषक, पदकांसह सिंधुदुर्गचे विजेते खेळाडू व अधिकारी.

सिंधुदुर्ग नगर रचना विभागाची बाजी

कोकण विभागीय स्पर्धा; पाच चषकांसह सहा पदकांची कमाई

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २३ ः नगररचना मूल्यनिर्धारण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये सिंधुदुर्गच्या नगर रचना विभागाने दमदार कामगिरी बजावली. तब्बल ४० वर्षांनंतर ११ पदकांची कमाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्याने वर्चस्व राखले. नगररचना विभागाच्या या यशस्वी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन नगर रचनाकार वि. तू. देसाई, सहाय्यक नगर रचनाकार च. अ. तायशेटे यांनी केले.
कोकण विभागीय नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांच्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा नवी मुंबई येथे नुकत्याच झाल्या. कोकण विभागातील आठ संघातील २६० हून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. क्रिकेट, कॅरम, टेबल टेनिस, २०० मीटर धावणे, रिले यामध्ये सिंधुदुर्गाच्या नगररचना विभागाच्या खेळाडूंनी चमक दाखविली. क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग उपविजेता ठरला असून बेस्ट बॅट्समन म्हणून प्रीतम गायकवाड यांनी पदक पटकावले. श्रद्धा जाधव यांनी महिलांच्या कॅरम स्पर्धेमध्ये विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. तर महिलांच्या चाळीस वर्षांखालील टेबल टेनिसमध्ये प्राजक्ता गावडे यांनी प्रथम, सोनल अजळकर यांनी द्वितीय, तर श्रद्धा जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. दरम्यान, या सर्व स्पर्धक विजेत्यांचे नगररचना विभागाचे सहसंचालक कोकण विभाग यांनी विशेष अभिनंदन केले.
---
इतर काही स्पर्धांचा निकाल
पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत श्रीकृष्ण वेंगुर्लेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिलांच्या खुल्या गटातून रिले स्पर्धेत सोनल अजळकर, श्रद्धा जाधव, प्राजक्ता गावडे व रोहिणी नागरे या महिलांनी द्वितीय क्रमांक पटकावून या स्पर्धेतही आपले वर्चस्व कायम ठेवले. तर महिला दोरी उडीमध्ये श्रद्धा जाधव यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सिंधुदुर्गच्या नगररचना विभागाच्या या विजेता स्पर्धकांनी तब्बल सहा मेडल व पाच चषकांसह पारितोषिके पटकावली.