हेदवीतील वैशिष्ट्यपूर्ण माघी गणपतीचा उत्सव
rat२४१६.txt
बातमी क्र.. १६ ( टुडे पान २ )
rat२४१७.jpg -
७७९७४
हेदवी ः येथील दशभूजा मंदिरातील गणेशमूर्ती.
rat२४१८.jpg ः
७७९७५
लक्ष्मीदशभूजा गणपती मंदिर.
rat24p27.jpg ः
77997
बालगणपतीची मूर्ती पालखीत ठेवून सायंकाळी मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात.
आजपासून सुरू होणारा माघी गणपतीचा उत्सवही कोकणात आता मोठ्या दणक्यात होतो. परंपरेने दीर्घकाळ सुरू असलेले माघी गणेशोत्सव म्हणजे हेदवी अर्थात् लक्ष्मीदशभूजा गणपती मंदिर, आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती, गणपतीपुळे येथील श्री मंदिर, गणेशगुळे येथील गलबत्या गणेश ही ठळक आठवणारी नावं; मात्र गेल्या काही वर्षांतच अनेक गावांमधून उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. आदिती आणि कश्यप यांच्या पोटी जन्मलेल्या महोत्कट गणेशाच्या अवताराचा हा उत्सव असतो. देवांतक आणि नरांतक राक्षसांना मारण्यासाठी गणपतीचा हा अवतार असल्याचे मानले जाते.
- प्रतिनिधी
--
हेदवीतील वैशिष्ट्यपूर्ण माघी गणपतीचा उत्सव
हेदवी येथे गणेशमंदिरात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो. त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे कोळी बांधवांच्या चार पिढ्या या उत्सवाला येतात. हेदवीतील हे मंदिर साडेतीनशे वर्षाचे जुने आणि पेशवेकालीन मानले जाते. साधारणतः माधवराव पेशव्यांचा काळ येतो त्या वेळी केळकर नामक सिद्धपुरुषाला दृष्टांत झाला आणि हेदवीतील मंदिर पेशव्यांनी बांधून दिले, अशी कथा सांगितली जाते. सारसबागेतील गणपतीची प्रतिष्ठापना आणि या गणपतीची स्थापना सारख्याच काळात झालेली आहे. मूर्तीचे कोरीव काम नेपाळच्या धर्तीवर आहे. जंगलात असलेले मंदिर, गोड्या तेलाचे दिवे यामुळे दीर्घकाळ भक्तजन येथे जाण्याव्यतिरिक्त वटवाघळांचे वास्तव्य असे; मात्र गावातील शिवराम गोविंद उर्फ काकासाहेब जोगळेकर यांनी पुढाकार घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार केला. काकासाहेब हे अत्यंत गरीब अवस्थेत मुंबईत गेले आणि तेथे त्यांची भरभराट झाली. त्यामुळे १९५६च्या दरम्यान मुंबईतील काकासाहेबांच्या प्रभावाखाली कोळीबांधव, ते स्वतः आदींनी येऊन जीर्णोद्धार झाला. मूर्तीची साफसफाई झाली. त्यानंतर मूर्तीची कीर्ती सर्वदूर पसरली. भक्तांची संख्या वाढली आणि तेव्हापासून मुंबईपासून वसईपर्यंतच्या कोळी समाजातील भक्त आवर्जून या उत्सवाला येतात. काका जोगळेकर यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले; मात्र त्यानंतरही त्यांच्या संबंधातील सर्व आणि कोळीबांधव उत्सवाला येतात.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता कीर्तन होते. त्या आधी षोड्शोपचारे पूजा केली जाते. कीर्तनानंतर पाळण्यामध्ये देवळात दशभूजा गणेशाच्या मूर्तीची छोटी प्रतिकृती ठेवली जाते. या वेळी दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. गणेशजन्मानंतर बालमूर्ती रथात ठेवली जाते. तेथे गावातून त्याची मिरवणूक काढली जाते. हा रथ गावामध्ये भक्तगण ओढतात. रथाच्या मार्गावर सवाष्ण महिला बालगणेशाला ओवाळतात. सायंकाळी साडेसातपर्यंत ही मिरवणूक परतते. सायंकाळी गणेशाची बालमूर्ती पालखीत ठेवली जाते. त्यानंतर पालखीची प्रदक्षिणा होते. भक्तगण मृदुंगाच्या तालावर नाचत गजर म्हणतात. रात्री भजन केले जाते. पुढील दोन दिवसांत शक्य असल्यास गणेशयाग केला जातो किंवा सत्यविनायकाची पूजा होते. या उत्सवाचे हळूहळू पर्यटनासाठीही पॅकेज करता येणे शक्य आहे. सध्या देवळापर्यंतचा रस्ता डांबरी झाला आहे. हळूहळू भक्तजनांच्या पलीकडे उत्सवाला पर्यटकही येतील अशी आशा श्री लक्ष्मीदशभूजा गणेश देवस्थान संस्था हेदवीचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोगळेकर यांनी व्यक्त केली.
---
दशभूज गणेश...
या मंदिरातील गणपती मूर्ती १० हातांची आहे. याच कारणामुळे या गणपतीला दशभूज गणेश असे म्हटले जाते. या दहा हातांमध्ये चक्र, त्रिशूल, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्याची लोंबी हे आहेत. सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे. अशा प्रकारच्या गणेशमूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तीने करणे अभिप्रेत असल्याचा संकेतदेखील आहे. त्यामुळे दशभूज गणेशमूर्ती जास्त ठिकाणी आढळत नाही.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.