माघी गणेश जयंतीनिमित्त कुडाळात आज कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माघी गणेश जयंतीनिमित्त
कुडाळात आज कार्यक्रम
माघी गणेश जयंतीनिमित्त कुडाळात आज कार्यक्रम

माघी गणेश जयंतीनिमित्त कुडाळात आज कार्यक्रम

sakal_logo
By

माघी गणेश जयंतीनिमित्त
कुडाळात आज कार्यक्रम
कुडाळ, ता. २४ ः येथील बाजारपेठेतील श्री महापुरूष-समादेवी मांड देवस्थान येथे उद्या (ता.२५) माघी गणेश जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
आजपासून विविध कार्यक्रमांनी या उत्सवाला सुरुवात झाली. यादिवशी सकाळी गार्‍हाणे, गणपती पुजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राध्द, प्रतिनिधीपूजन (समारंभदान), शांतीपाठ, आचार्यदि, त्रत्विग्वरण, प्रकारशुद्धी, ब्रह्मदिमंडळ देवता, प्रासादवास्तू देवता, मुख्य देवता स्थापना व पूजन, दुपारी गणपती अथर्वशीर्ष जप, रात्री श्रीदेवी यक्षिणी दशावतार नाट्यमंडळ, माणगांव यांचा ‘प्रारब्ध’ दशावतारी नाट्यप्रयोग अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. श्री गणेश जयंती दिवशी उद्या सकाळी साडेसातला शांतीपाठ, प्रकारशुद्धी स्थापित देवता पुजन, साडेआठला अग्निस्थापना, ग्रहस्थापना व पूजन, नऊला वास्तू व ग्रह्यजन पूर्वक मुख्य प्रधान देवता हवन, अकराला बलिदान, साडेअकराला पूर्णाहूती, गणेश याग सांगता, दुपारी बाराला महानैवेद्य, आरती, गाऱ्हाणे, एकला तिर्थप्रसाद, सायंकाळी सहाला सुश्राव्य भजन, रात्री आठला श्री समादेवी युवक मित्रमंडळ आयोजित कुडाळ शहर मर्यादित १२ वर्षांखालील फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना गौरवचिन्ह व रोख रक्कम गौरविण्यात येणार आहे. रात्री साडेनऊला पी. के. डान्स क्रू आणि फिटनेस स्टुडिओ आयोजित नृत्याचा अविष्कार कार्यक्रम सादर होणार आहे.