साडवली ः आठल्ये महाविद्यालयाच्या आमिषा केदारीचा आर. डी. परेडमध्ये सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडवली ः आठल्ये महाविद्यालयाच्या आमिषा केदारीचा आर. डी. परेडमध्ये सहभाग
साडवली ः आठल्ये महाविद्यालयाच्या आमिषा केदारीचा आर. डी. परेडमध्ये सहभाग

साडवली ः आठल्ये महाविद्यालयाच्या आमिषा केदारीचा आर. डी. परेडमध्ये सहभाग

sakal_logo
By

rat२४p३.jpg ः KOP२३L७७९३६
साडवली ः देवरूख कॉलेजची विद्यार्थिनी आमिषा केदारीची दिल्ली संचलनासाठी निवड.

काही सुखद ................लोगो

प्रजासत्ताकदिनी परेडसाठी आमिषा केदारीची निवड

आठल्ये-सप्रे महाविद्यालयाला बहुमान ;११६ कॅडेट्समधून बाजी
साडवली, ता. २४ ः विद्यार्थिनी लिडिंग कॅडेट आमिषा संतोष केदारी (२ महाराष्ट्र नेव्हल युनिट, एनसीसी, रत्नागिरी) हिची कर्तव्यपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी (संचलनासाठी) निवड झाली आहे. देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाची महाविद्यालयातून निवड झालेली आमिषा ही दुसरी विद्यार्थिनी आहे. यापूर्वी राजेंद्र विनोद सावंत याची जानेवारी २०१९च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी निवड झाली होती. आमिषाच्या निवडीमुळे पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाविद्यालयात सन २०१६ पासून नेव्हल एनसीसीचा तर आर्मी एनसीसीचा आरंभ सन २०१९ मध्ये झाला आहे.आमिषा हिने बारावीपासून (शैक्षणिक वर्ष २०२१-२२) नेव्हल एनसीसीमध्ये सहभाग घेतला. सध्या ती एनसीसीच्या दुसऱ्या वर्षांमध्ये तर महाविद्यालयात प्रथम वर्ष, कला या वर्गात शिकत आहे. महाविद्यालय जून, २०२२ पासून आरडीसी कॅम्पमध्ये सहभाग घेण्याकरिता प्रशिक्षण सुरू होते. कोल्हापूर येथे पहिला कॅम्प १३ ऑगस्ट २०२२ पासून सुरू झाला. त्यानंतर पुणे येथे राज्यभरातून आलेल्या ११६ कॅडेट्समधून काटेकोर निवड चाचण्यानंतर तिची निवड करण्यात आली. आरडीसी परेडकरिता तिने प्रचंड मेहनत घेतली आहे. आरडीसी परेड निवडीच्या तयारीसाठी तिला माजी विद्यार्थी कल्पेश मिरगल याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आमिषा हिच्या यशाचे कौतुक करताना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर म्हणाले, आमिषाने मिळवलेले हे यश प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटीने मिळवले असून याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. आमिषाचे यश हे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी ठरणार आहे. यावर्षीची प्रजासत्ताक दिनाची प्रत्यक्ष परेड पाहण्यासाठी सर्वांनी https://youtu.be/o_९७TWc२DZ४ या लिंकचा वापर करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी केले आहे. आमिषाला कमांडिंग ऑफिसर राजेशकुमार, सब-लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये, सीटीओ प्रा.सानिका भालेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.