तरंदळे शाळेचे छप्पर धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरंदळे शाळेचे छप्पर धोकादायक
तरंदळे शाळेचे छप्पर धोकादायक

तरंदळे शाळेचे छप्पर धोकादायक

sakal_logo
By

78018
तरंदळे : येथील शाळा क्रं.१ चे छप्पर धोकादायक झाले आहे.


तरंदळे शाळेचे छप्पर धोकादायक

२६ जानेवारीपर्यंत दुरुस्तीचा निर्णय न झाल्यास मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा इशारा


कणकवली, ता.२४ : तालुक्‍यातील तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर धोकादायक झाले आहे. २६ जानेवारीपर्यंत छप्परची दुरूस्ती न झाल्‍यास २७ जानेवारी पासून शाळेत मुलांना पाठविले जाणार नाही. प्रशासनाचा निषेध म्हणून शाळेच्या परिसरात काळे झेंडे लावले जातील, असा इशारा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमाकांत देवलकर, ग्रामस्थ अनंत सावंत, अमित सावंत यांनी दिला.
याबाबत पालक आणि ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्‍हटले आहे की, तरंदळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ चे छप्पर मोडकळीस आले आहे. या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गात ६१ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या शाळेची दुरुस्ती करून छप्पर लोखंडी बनवावे यासाठी सन २०१६ पासून आतापर्यंत अनेक वेळा शिक्षण विभाग तसेच प्रशासनाला निवेदने दिली आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी संबधित शाळेची पाहणी केली आहे. तसेच दुरुस्तीची आवश्यकता असल्याचा शेरा मारला आहे; मात्र, त्यानंतर कोणीही त्याची दखल घेतलेली नाही.
--
एकाच खोलीत विद्यार्थी
सध्या एकाच खोलीत दोन ते तीन इयत्तेतील मुलांना एकत्र बसविले जात आहेत. काही मुले कंटाळून कणकवली येथे दुसऱ्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आम्ही गावातील ग्रामस्थ व पालकानी २७ जानेवारी पासून शाळेत मुले न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.