कोकणात कर्ज घेत नसल्यामुळे जिल्ह्याबाहेर कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात कर्ज घेत नसल्यामुळे जिल्ह्याबाहेर कर्ज
कोकणात कर्ज घेत नसल्यामुळे जिल्ह्याबाहेर कर्ज

कोकणात कर्ज घेत नसल्यामुळे जिल्ह्याबाहेर कर्ज

sakal_logo
By

rat२४१०.txt

( पान २)

कोकणात कर्जाला मागणी नाही...

जयवंत जालगावकर ; मध्यवर्ती बँकेचा नाईलाज

दाभोळ, ता. २४ ः रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कर्ज देण्याची क्षमता असूनही कोकणातील जनता कर्ज घेत नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील साखर कारखान्यांना नाइलाजाने कर्ज द्यावे लागते, ही कोकणातील बँकांची शोकांतिका आहे. हा कर्जपुरवठा केला नाहीतर ठेवीदारांना व्याज कसा देणार, बँकेची पत कशी वाढेल, असे अनेक प्रश्न संचालकांना पडत असतात, अशी माहिती दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांनी दिली.

दापोली तालुक्यातील पन्हाळे शिरवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नूतन वस्तूच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. जालगावकर म्हणाले, दापोली तालुक्यातील ४१ विविध कार्यकारी संस्था कर्ज पुरवठा करण्याकरिता सक्षम असून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारची नाबार्ड व महाराष्ट्र सरकार या विविध कार्यकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक योजनांमार्फत पाठपुरावा करत असते. विभागातील तरुणांनी गावातच राहून स्वतःची प्रगती करावी, गावातील विविध कार्यकारी संस्था आपल्याला उद्योग करण्यास नक्कीच सहकार्य करत राहील. दापोली तालुक्यातील पन्हाळे-शिरवणे विविध कार्यकारी सेवा संस्थेने तालुक्यातील एक चांगली संस्था म्हणून जनतेमध्ये विश्वास निर्माण केला आहे. संस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करून चांगली प्रगती केली आहे. सभासदांना उत्तम सेवा देत आहे असल्याचे सांगत तत्कालीन संस्थापक सदस्यांचे कौतुक केले.
--