घाटमार्गासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटमार्गासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार
घाटमार्गासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

घाटमार्गासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

sakal_logo
By

rat२४१९.txt

( पान २ )

घाटमार्गासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

संतोष येडगे ; संगमेश्वर-पाटण ; निवृत्त वनाधिकाऱ्यांचा पुढाकार

संगमेश्वर, ता. २४ ः संगमेश्वर-पाटण घाटमार्ग व्हावा म्हणून संगमेश्वर-पाटण घाटमार्ग समन्वय समितीचे समन्वयक संतोष येडगे यांनी जनतेला आवाहन केल्यानंतर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या कामाच्या पूर्वपरवानगीसाठी आवश्यकता भासल्यास आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे येडगे यांनी पत्रकाराना सांगितले.रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांच्या चार तालुक्यातील जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. सध्या या घाटमार्गाच्या मागणीसाठी व्यापक सह्यांची मोहीम राबवली जात असून साधारण २५ हजार सह्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे. या कामासाठी सर्वपक्षीय नेत्यांना विनंती केली असून सर्व पक्षाचे नेते सकारात्मक असल्याचे येडगे यांनी सांगितले.

संगमेश्वर-पाटण घाटमार्ग कामासाठी केंद्र सरकारकडून वन (संवर्धन) अधिनियम १९८० Forest ( conservation ) Act १९८० अंतर्गत पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे तर राज्य वन्यजीव मंडळ (State Board of Wildlife- SBWL) व केंद्रीय वन्यजीव मंडळ ( National Board of Wildlife- NBWL) मान्यता घ्यावी लागणार आहे. वनविभागाच्या परवानगीसह सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण मंत्रालयाची ना हरकत इत्यादी बाबींची परवानगी घ्यावी लागणार आहे. या परवानग्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणी करून आवश्यक पाठपुरावा करावा अशी विनंती येडगे यांनी केली आहे. येडगे यांच्यावतीने जनतेच्या मागणीचा विचार करून जनतेची बाजू मांडण्यासाठी मुंबई कांदळवन विभागाचे निवृत्त वरिष्ठ वनाधिकारी विकास जगताप यांना विनंती केली आहे. जगताप हे वनविभागाच्या रत्नागिरी, सांगली, भोर पुणे, प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूर आदी ठिकाणी वरिष्ठ पदावर सेवा बजावलेले निवृत्त अधिकारी आहेत. ते या कामासाठी पुढाकार घेणार असल्याने कामाच्या परवानगीच्या आशा पल्लवित झाल्या असून, त्यांच्या ज्येष्ठतेचा या कामात उपयोग होणार असल्याचे येडगे यांनी सांगितले.
--

सर्व प्रयत्न करणार
संगमेश्वर ते चाफेर (पाटण) हा एकूण ४६.६०० कि.मी. चा रस्ता आहे. यापैकी २६.६०० कि.मी. एकेरी रस्ता तयार असून फक्त २० कि.मी. रस्ता तयार करावा लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा हद्दीतील ५.५०० कि.मी. तर सातारा जिल्हा हद्दीतील १४.६०० कि.मी. अंतरामधील रस्ता शिल्लक आहे. या कामाला तातडीने मंजुरी मिळण्यासाठी शासनदरबारी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे येडगे यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने या घाटमार्गाचा आराखडा तयार करून तो राज्य सरकारला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
----------------