Mon, Feb 6, 2023

रत्नागिरी ः प्रजासत्ताकदिनी शिक्षक पावरा यांचे 401वे उपोषण
रत्नागिरी ः प्रजासत्ताकदिनी शिक्षक पावरा यांचे 401वे उपोषण
Published on : 24 January 2023, 1:32 am
प्रजासत्ताकदिनी शिक्षक पावरा यांचे उपोषण
रत्नागिरी, ता. २४ ः शिक्षक सुशीलकुमार पावरा यांचे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ४०१वे उपोषण तहसील कार्यालय दापोलीसमोर होणार आहे. उपोषणाचे निवेदन पावरा यांनी तहसीलदार दापोली वैशाली पाटील यांना दिले आहे. दोषी, भ्रष्टाचारी, षड्यंत्रकारी, बोगस अपंग प्रमाणपत्रधारक व बोगस डिग्रीधारक दोन शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना व ३१ दोषारोपित तत्कालीन शिक्षणाधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा, २ मुळ कागदपत्रे २ लाख दंडाच्या रकमेसह परत करा अशा २८ मागण्यांसाठी जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदरचे शिक्षक पावरा हे आपले ४०१वे उपोषण तहसील कार्यालय दापोलीसमोर करणार आहेत.