रिफायनरी विरोधक तडीपारीची सुनावणी 7 फेब्रुवारीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिफायनरी विरोधक तडीपारीची सुनावणी 7 फेब्रुवारीला
रिफायनरी विरोधक तडीपारीची सुनावणी 7 फेब्रुवारीला

रिफायनरी विरोधक तडीपारीची सुनावणी 7 फेब्रुवारीला

sakal_logo
By

रिफायनरी विरोधक तडीपारीची
सुनावणी ७ फेब्रुवारीला
रत्नागिरी, ता. २४ ः रिफायनरी विरोधकांसंदर्भात राजापूर प्रांत कार्यालयात सुरु असलेली तडीपारी संदर्भातील सुनावणी ७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बारसू सोलगाव येथील प्रस्तावित रिफायनरीला पुन्हा एकदा विरोध सुरु करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोध करणाऱ्या सहाजणांना पोलीस यंत्रणेकडून तडीपारी का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती.
यासंदर्भात प्रांताधिकारी सुनावणी सुरु आहे. मंगळवार २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. परंतु ती आता ७ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, सत्यजित चव्हाण, सतिश बाणे, दीपक जोशी, नितीन जठार, नरेंद्र जोशी हे सहाहीजण मंगळवारी उपस्थित होते. याबाबत बोलताना अमोल बोळे म्हणाले की, ‘आमचे म्हणणे आम्ही प्रांतांसमोर मांडले आहे. याभागात आतापर्यंत झालेले सर्वेक्षण हे बेकायदेशीर होते. त्याला कोणतेही परवानगी नव्हती. परवानगीशिवाय आम्ही सर्वेक्षण करु देणार नाही. यापुढेही आमचा लढा सनदशीर मार्गाने सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले.’