आंगणेवाडी यात्रेस सर्वतोपरी सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंगणेवाडी यात्रेस सर्वतोपरी सहकार्य
आंगणेवाडी यात्रेस सर्वतोपरी सहकार्य

आंगणेवाडी यात्रेस सर्वतोपरी सहकार्य

sakal_logo
By

78096
आंगणेवाडी ः भराडी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी भेट देत आढावा घेतला.

आंगणेवाडी यात्रेस सर्वतोपरी सहकार्य

खासदार विनायक राऊत ः यात्रोत्सव पूर्वतयारीचा घेतला आढावा

मालवण, ता. २४ : भराडी देवीची यंदा होणारी यात्रा तीन वर्षांनंतर होणारी सर्वांत मोठी यात्रा आहे. भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी यावर्षी यात्रेत होण्याची अपेक्षा असून भाविकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी आंगणेवाडी मंडळास सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी आंगणेवाडी येथे दिली.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या खासदार राऊत व आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज आंगणेवाडी येथे भेट देऊन भराडी देवीचे दर्शन घेतले. तसेच यात्रा तयारीची माहिती आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे व पदाधिकारी आंगणे कुटुंबीयांकडून घेतली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपतालुका प्रमुख अमित भोगले, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, मर्डे उपसरपंच पिंट्या गावकर, बंडू चव्हाण, अरुण लाड, सुभाष धुरी, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, विजय पालव, नंदकिशोर कासले, मुळीक आदी उपस्थित होते.
यावर्षी यात्रेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. रस्ते, पाणी, वीजपुरवठा, बीएसनल नेटवर्क, आरोग्य सुविधा व अन्य सुविधा मंडळाच्या माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून देत असताना काही समस्या असतील तर त्या मंडळ व प्रशासन दूर करत आहे. आमदार नाईक, संपर्कप्रमुख दुधवडकर व आमच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही खासदार राऊत यांनी दिली.
---
सर्वांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
आम्हा सर्वांच्या श्रद्धेचे स्थान आंगणेवाडी भराडी देवी आहे. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक भक्तगण व शिवसैनिक आंगणेवाडी यात्रेस येणार आहेत. भराडी मातेने सर्वांना निरोगी दीर्घायुष्य देवो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे असलेले अरिष्ट दूर होवो, अशी प्रार्थना भराडी देवीच्या चरणी करण्यात आली असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.