विजयदुर्गात माघी गणेश जयंती उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयदुर्गात माघी गणेश जयंती उत्सव
विजयदुर्गात माघी गणेश जयंती उत्सव

विजयदुर्गात माघी गणेश जयंती उत्सव

sakal_logo
By

विजयदुर्गात माघी गणेश जयंती उत्सव

आजपासून कार्यक्रम; विठ्ठलवाडी मित्रमंडळाचा पुढाकार


देवगड, ता. २४ ः विजयदुर्ग (ता.देवगड) येथील विठ्ठलवाडी मित्रमंडळातर्फे २५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाचा सार्वजनिक माघी गणेशोत्सव उद्यापासून (ता. २५) सुरू होत आहे. रविवारपर्यंत (ता. २९) उत्सव चालणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
उद्या सकाळी साडेनऊला श्रींच्या मूर्तीचे आगमन, प्राणप्रतिष्ठापना आणि आरती, रात्री साडेआठला आनंद जोशी बुवा (नाडण) आणि बुवा संतोष आरावकर (तुळसवडे-राजापूर) यांच्यामध्ये डबलबारी भजनांचा सामना होणार आहे. गुरुवारी (ता. २६) रात्री साडेआठला पुरुषांची रस्सीखेच स्पर्धा, दहाला स्थानिक बाल कलाकारांचा नृत्याविष्कार होणार आहे. शुक्रवारी (ता. २७) रात्री दहाला गोपाळकृष्ण प्रासादिक नाट्यमंडळ (जानशी राजापूर) निर्मित गंगाराम गवाणकर लिखित नाटक ‘विठ्ठल विठ्ठल’, शनिवारी (ता. २८) सकाळी दहाला श्री महापूजा, दुपारी तीनला हळदीकुंकू कार्यक्रम, चारला महिलांचे भजन होणार आहे. सायंकाळी सातला महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा, रात्री दहाला वाडये परिवारातर्फे भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स आणि समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार, २ हजार रुपये तसेच पाचव्या आणि उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी ५०० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. खुल्या समूह नृत्य स्पर्धेसाठी अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रुपये आणि तीन उत्तेजनार्थ २ हजार रुपयांची बक्षिसे तसेच दोन्ही गटातील पहिल्या दोन विजेत्यांना चषक देण्यात येणार आहे. अविनाश वाडये, ओम वाडये यांच्याकडे नावे द्यावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.