चित्रकला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रकला स्पर्धा
चित्रकला स्पर्धा

चित्रकला स्पर्धा

sakal_logo
By

rat२५१४.txt

बातमी क्र..१४ (पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat२५p९.jpg ः
७८१४८
लांजा ः विद्यार्थांना बक्षीस वितरण करताना विश्वनाथ मांगले.
--

निबंध, चित्रकला स्पर्धेत श्रेया, भूमिका प्रथम

लांजा ः लांजा येथील साईबाबा स्पोर्ट्स अँड सोशल क्लब सिंधुदुर्ग शाखेने जिल्हा परिषद शाळा लांजा नं. ५ येथे चित्रकला आणि निबंध स्पर्धा उत्साहात झाल्या. त्याचा बक्षीस समारंभ नुकताच झाला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मिंगेल मनतेरो, शिक्षण विस्तार अधिकारी विनोद सावंग, दिलीप मुजावर, संतोष बेनकर, विश्वनाथ मांगले, राजाराम लांजेकर, विष्णू वाघधरे, मुख्याध्यापक विमल चव्हाण, चंद्रकांत पावसकर आदी उपस्थित होते. चित्रकला व निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. निसर्गाचे चित्र या विषयामध्ये भूमिका तांबे (प्रथम), निषाद पाध्ये (द्वितीय), सिद्धी खानविलकर (तृतीय) तर जीत खोत (उत्तेजनार्थ). निबंध स्पर्धा पाणी संपले तर.... या विषयावर घेण्यात आली होती. यामध्ये श्रेया चाचे (प्रथम), मीत करंबळे (द्वितीय), निशात पाध्ये (तृतीय) आणि समीक्षा नाझरे (उत्तेजनार्थ) यांनी यश संपादित केले. या वेळी विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने रोख पारितोषिकासह प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आली.
---
फोटो ओळी
-rat२५p१०.jpg ः

साडवली ः देवरूख येथील भैया खाके या रिक्षाचालकाने प्रवाशाचा मोबाईल परत केला.
---
रिक्षाचालक प्रांजल खाके यांचा प्रामाणिकपणा

साडवली ः देवरूख मातृमंदिर रिक्षाथांब्यावरील रिक्षाचालक प्रांजल उर्फ भैया खाके यांनी रिक्षात राहिलेला प्रवासी अरुण करकरे यांचा १५ हजाराचा मोबाईल प्रामाणिकपणे परत दिला. सकाळी करकरे यांनी मातृमंदिर ते तहसील कार्यालय असा रिक्षातून प्रवास केला. उतरताना पैसे देताना त्यांनी फोन सीटवर ठेवला व गडबडीत ते निघून गेले. थोड्याच वेळात करकरे यांच्या ही बाब लक्षात आली व त्यांनी पत्नीच्या फोनवरून रिंग केली. कालांतराने भैया खाके यांना सीटवरील फोन दिसला व आलेला कॉल दिसला. त्वरित खाके यांनी करकरेंशी संपर्क साधला व फोन घेऊन जा, असे सांगितले. करकरे यांनी खाके यांची भेट घेऊन फोन ताब्यात घेतला व खाके यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आभार मानले.
---
पैसाफंडमध्ये चित्रकला स्पर्धा

संगमेश्वर ः परीक्षा पे चर्चा पर्व ६ या उपक्रमांतर्गत शिक्षण आयुक्ताच्या परिपत्रकानुसार ९ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन संगमेश्वरच्या शिक्षण विभागाने केले होते. तालुक्याचा विस्तार पाहता अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभाग घेता यावा यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी संगमेश्वर तालुक्यात चार ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेसाठी १० विषय देण्यात आले होते. दोन तास वेळ देण्यात आला होता. व्यापारी पैसाफंड संस्थेच्या पैसाफंड इंग्लिश स्कूल येथे ५ शाळांमधून ७३ विद्यार्थी स्पर्धेसाठी प्रविष्ट झाले. शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये यांनी मार्गदर्शन केले. या वेळी एकूण ७३ तर आरवली केंद्रावर येथे ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते.