-स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण भाग ’नॉट रिचेबल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण भाग ’नॉट रिचेबल’
-स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण भाग ’नॉट रिचेबल’

-स्वातंत्र्यानंतरही ग्रामीण भाग ’नॉट रिचेबल’

sakal_logo
By

rat२५२७.txt

(पान २ साठीमेन)

ग्रामीण भाग अद्याप ’नॉट रिचेबल’

खेड तालुक्यातील चित्र ; रेशन दुकानासह ऑनलाईन व्यवहारातही अडचणी

खेड, ता. २५ ः स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असून आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल युगाचा आरंभ झाला आहे; मात्र परंतु आजही सर्वसामान्य मोबाईल सेवेपासून वंचित आहे. खेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोबाईलची रेंज पोचलेली नसल्याने ही गावे डिजिटल क्रांतीपासून दूरच आहेत. रेंज मिळवण्यासाठी कधी डोंगरमाथा तर कधी घरापासून दूर अंतरावर जाऊन नेटवर्कच्या शोधार्थ भटकंती करावी लागत आहे.
खेड तालुक्यातील बहुतांशी गावे वाड्यावस्ती तांडे सह्याद्रीच्या पायथ्याशी वसली आहेत. या ठिकाणी मोबाईल सेवेची कोणतीही सेवा उपलब्ध नसल्याने डिजिटल युगात येथील नागरिक ’आऊट ऑफ कव्हरेज’ आहे. ’कनेक्टिंग पीपल’चे ब्रीदवाक्य घेऊन शासकीय पातळीवर कार्यरत असलेली बीएसएनएलसारखी सेवा तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामीण भागात पोहचली होती. ठिकठिकाणी मोबाईल टॉवर उभे करून सेवा देण्याच्या हेतूने कार्यरत झाली; मात्र अवघा ग्रामीण भाग जोडण्यात बीएसएनएलच्या पदरी अपयशच आले असल्याने ग्रामीण भागातील कनेक्टिंग पीपल या ब्रीदचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी मोबाईल कंपनीचा आधार वाटत होता. मात्र त्यालाही आता रेंज नसल्याने भटकंती करावी लागत आहे. खासगी मोबाईल कंपन्यादेखील ग्रामीण भागाकडे लक्ष देण्यात कानाडोळा करत असल्याने ग्रामीण भाग नो नेटवर्कच्या समस्येने हैराण आहे. डिजिटल इंडियासारखा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला असल्याने यात रेशन वितरणसारख्या अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत; मात्र नेटवर्क नसल्याने या सेवेलाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. कोरोना काळात शासनाकडून शालेय शिक्षण ऑनलाइन केले आहे; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाइन शालेय शिक्षणालादेखील मुकला आहे.
--
कोट
खेड तालुक्याच्या सह्याद्रीपट्ट्यात आजही नेटवर्क नाही. सुरवातीला काही ठिकाणी खासगी कंपनीचे नेटवर्क होते; परंतु गेली अनेक वर्षे या ठिकाणी नेटवर्क नाही. सद्यःस्थितीत आमच्या सह्याद्रीपट्ट्यात नेटवर्क नसल्यामुळे रेशन दुकानावरही धान्य घेताना आमची पंचाईत होत आहे. शासनाने या गावातील समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
--प्रमोद सुर्वे, ग्रामस्थ, बिरमणी
--
कोट
कोकणातील गावे ही दऱ्‍याखोऱ्‍यात वसलेली आहेत. सद्यःस्थितीत खेड तालुक्यातील १७ गावांमध्ये बीएसएनएलने टॉवर उभारण्यासाठी शासकीय जागांची मागणी केली आहे. तालुक्यातील आणखी काही गावांमध्ये नेटवर्क नसल्यास किंवा नेटवर्कची कोणतीही अडचण असल्यास संबंधित ग्रामस्थांनी बीएसएनएल कार्यालय किंवा शासनाकडे विनंती अर्ज करावा. त्या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येईल, --राजेश्री मोरे, प्रांताधिकारी, खेड
--
चौकट
१७ गावात टॉवरच्या जागेसाठी मागणी

शेल्डी, कळंबणी खुर्द, चोरवणे-उत्तेकरवाडी, निवे, दहिवली, पुरेखुर्द, शेरवल, शिवतर, आंबये, कुरवळ गावठाण, तळवटपाल, जैतापूर, चाटव, वाडीबीड, निळवणे, घेरासुमारगड, कांदोशी या गावांमध्ये फोर जी टॉवर उभारण्यासाठी बीएसएनएल कंपनीने शासनाकडे शासकीय जागा मिळावी अशी मागणी केली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.