‘मराठी’मध्ये इंग्रजीचा वापर टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मराठी’मध्ये इंग्रजीचा वापर टाळा
‘मराठी’मध्ये इंग्रजीचा वापर टाळा

‘मराठी’मध्ये इंग्रजीचा वापर टाळा

sakal_logo
By

78210
देवगड ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते.

‘मराठी’मध्ये इंग्रजीचा वापर टाळा

मंदाकिनी गोडसे ः देवगडमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

देवगड, ता. २५ ः मराठीचे स्थान जगातल्या प्रमुख भाषांमध्ये आहे. मराठी भाषा बोलताना त्यावर इंग्रजीचा प्रभाव दिसण्यापेक्षा मराठीतलेच शब्द वापरावेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा शुद्ध करण्यास प्रयत्न केले. त्यांनी अनेक प्रतिशब्द मराठीतून बनविले, अस मत येथील निवृत्त शिक्षिका मंदाकिनी गोडसे यांनी व्यक्त केले.
येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथप्रदर्शन भरविले होते. ग्रंथप्रदर्शन उद्‍घाटन प्रसंगी गोडसे बोलत होत्या. यावेळी ग्रंथालयाला देणगीद्वारे मिळालेल्या आणि शासनमान्य यादीतील खरेदी केलेल्या पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.
यावेळी गोडसे म्हणाल्या, ‘‘मराठीचे स्थान जगातल्या प्रमुख भाषांमध्ये आहे. संस्कृत भाषा मराठीची जननी आहे. भाषा तज्ज्ञांच्या मते आपल्या भाषेचे अस्तित्व सुमारे दीड हजार वर्षांपासून बोली भाषेतून, चित्रलिपीतून अवगत होते. मराठी भाषा बोलताना त्यावर इंग्रजीचा प्रभाव दिसून येतो. मराठीतून बोलताना मराठीतलेच शब्द वापरावेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषा शुद्धी करण्यास प्रयत्न केले. त्यांनी अनेक प्रतिशब्द मराठीतून बनविले. त्याचा उपयोग आजही संभाषणात व शासन दरबारी केला जातो. मराठी भाषा समृद्ध आहे. म्हणूनच साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत यासारख्या प्रभावी माध्यमांद्वारे सर्वदूर पोहोचू शकली. ती विज्ञान भाषा होण्यासाठी शासनातर्फे विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त संवादातून, संभाषातून, अभ्यासातून, वाचनातून, लिखाणातून तिचे संवर्धन व्हावे, यासाठी कार्यक्रम घेतले जातात.’’ ग्रंथालयाच्या सर्व वाचकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्णिक यांनी केले. ग्रंथालयाचे कार्यकारी सदस्य दत्ता जोशी तसेच संतोष पाटणकर, अमित जाधव, आरती खडपकर आदी वाचक उपस्थित होते. सचिव संजय धुरी यांनी स्वागत केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक यांनी आभार मानले.