
रत्नागिरी- 27 पासून इन्फिगो हॉस्पीटलमध्ये
डॉ. कामत यांचे २७ पासून
इन्फिगो हॉस्पिटलमध्ये शिबीर
रत्नागिरी, ता. २५ : मधुमेही रुग्णांसाठी इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये खास रेटीना स्पेशालिस्ट डॉ. प्रसाद कामत हे शिबिर घेणार आहेत. २७ ते २९ जानेवारीपर्यंत साळवी स्टॉप येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतील, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर यांनी दिली.अडीच वर्षांत डॉ. कामत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल ८००० रुग्णांची तपासणी केली. यातील ३०० जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. प्रसाद कामत सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत तपासणी करणार आहेत. याकरिता रुग्णांनी पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे केले आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल रत्नागिरी येथे ग्रीन लेझर, डायमेन्शनल ऑप्टिकल टोपोग्राफी, फिल्ड ॲनालायझर ,अर्टली मशीन अशी अत्याधुनिक निदान यंत्रणे असून या द्वारे रेटीनाच्या समस्यांची अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने तपासणी केली जाते.