
लांजा-लांजात गणरायाचे जल्लोषात आगमन
फोटो ओळी
-rat२५p३०.jpg ःKOP२३L७८२५५ लांजा ः शेकडो वारकऱ्यांच्या सहभागाने लांजा शहर भक्तिमय. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लांजाच्या राजाचे जोरदार आगमन झाले.
लांजात गणरायाचे जल्लोषात आगमन
लांजा, ता. २५ ः गणपती बाप्पाचा जयघोष आणि टाळमृदुंगाचा गजर करत शेकडो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्याने लांजाच्या राजाचे जल्लोषाने आगमन झाले. शेट्ये यांच्या गणपती कारखान्यातून या गणपती व दिंडी मिरवणुकीला सुरवात झाली.
सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ बाजारपेठ लांजाच्यावतीने सलग ३२व्या वर्षी माघी गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरवात झाली. श्रींचे गणेश आगमन वारकरी फडकरी दिंडी सोहळ्याच्या ३०० ते ४०० वारकरी भक्तांच्या सहभागातून, भक्तिमय अभंगरूपी भजन गात सुरवात झाले. शहरातील सीताराम शेट्ये यांच्या गणपती कारखान्यातून साटवले रोड ते लांजा बाजारपेठेतून दिंडी मिरवणुकीने श्रींचे आगमन झाले. पुढील दहा दिवस भारतीय संस्कृती, परंपरा महाराष्ट्राची लोककला जतन करताना वैविध्यपूर्ण अशा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या दिंडीत असलेल्या वारकऱ्यांच्या सहभागाबरोबरच भगवे ध्वज, टाळ मृदुंगाचा नादघोष यामुळे संपूर्ण लांजा शहर परिसर हा भक्तिमय बनवून गेल्याचे चित्र या निमित्ताने पाहावयास मिळाले.