फोटोसंक्षिप्त-मडुरा येथे शनिवारी पुस्तक प्रदान कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-मडुरा येथे शनिवारी 
पुस्तक प्रदान कार्यक्रम
फोटोसंक्षिप्त-मडुरा येथे शनिवारी पुस्तक प्रदान कार्यक्रम

फोटोसंक्षिप्त-मडुरा येथे शनिवारी पुस्तक प्रदान कार्यक्रम

sakal_logo
By

फोटोसंक्षिप्त

मडुरा येथे शनिवारी
पुस्तक प्रदान कार्यक्रम
बांदा ः मडुरा येथे न्यू इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये शनिवारी (ता. २८) सकाळी १० वाजता डॉ. मोडक प्रतिष्ठान बांदा व ‘ग्रंथ आपल्या दारी’ नाशिक यांच्यामार्फत मडुरा हायस्कूलला विविध १०० पुस्तकांची पेटी प्रदान कार्यक्रम आणि रोणापाल (सावंतवाडी) येथील दया सागर छात्रालयाच्या मासिक अन्नदानाची रक्कम देण्याचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी डॉ. मोडक प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर केसरकर यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बांदा येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट चंद्रकांत सावंत, माजी मुख्याध्यापक व बांदा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित रहावे, असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षक अच्युत पिळणकर यांनी केले आहे.

‘टोपीवाला तंत्रशाळा’चे
विद्यार्थ्यांना आवाहन
सिंधुदुर्गनगरी : शैक्षणिक सत्र २०२२ पर्यंतचे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिझायनिंग, शिवण व कर्तन या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तीर्ण प्रमाणपत्रे व गुणपत्रके अद्याप संस्थेतून घेऊन गेलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:चे ओळखपत्र व पासपोर्ट फोटो सोबत आणून आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस व सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून घेऊन जावेत, असे आवाहन टोपीवाला स्मारक तंत्रशाळा तंत्र माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे.