
ओरोस येथे विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
78315
ओरोस ः मुलांना मार्गदर्शन करताना समुपदेशक.
ओरोस येथे विद्यार्थ्यांना
कायदेविषयक मार्गदर्शन
बांदा, ता. २५ ः राष्ट्रीय कन्या दिनानिमित्त कोकण कला व शिक्षण विकास संस्था, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुदानित महिला मंडळ कुडाळ संचलित कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, कुडाळ, महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अनुदानित व महिला मंडळ कुडाळ संचलित महिला समुपदेशन केंद्र, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओरोस बुद्रुक नंबर १ येथे मुलांसाठी सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श तसेच कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले.
लहान मुलांवरील अत्याचाराची, लैंगिक शोषणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक गुन्ह्यांची सुरुवात असुरक्षित स्पर्शातून होते. या अनुषंगाने समुपदेशक करिष्मा परब यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रात शाळेतील एकूण १७३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ‘कोकण कला व शिक्षण विकास’ संस्थेतर्फे प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे, समुपदेशक समीर शिर्के, कुणाल चव्हाण, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, कुडाळतर्फे करिष्मा परब, हरेश शेर्लेकर, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यावतीने प्रियांका बाक्रे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका मुंडले, आदींसह शिक्षकांचे सहकार्य लाभले.