ऑलिव्ह रिडलेची ७५ पिल्ले 
आचऱ्यात समुद्रात झेपावली

ऑलिव्ह रिडलेची ७५ पिल्ले आचऱ्यात समुद्रात झेपावली

Published on

78282
आचरा ः येथील किनाऱ्यावर संवर्धन केलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

ऑलिव्ह रिडलेची ७५ पिल्ले
आचऱ्यात समुद्रात झेपावली

आचरा, ता. २५ ः येथील समुद्रकिनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या ७५ पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी सूर्यकांत धुरी यांनी शासकीय नियमाप्रमाणे समुद्रात सोडले.
यावेळी वन विभागाचे संजू जाधव, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, शरद धुरी, अजय कोयंडे, जितेंद्र धुरी, ममता मुळेकर, गणधाली धुरी, गायत्री वाडेकर, स्वप्नील जोशी, नंदू तळवडकर, शुभ्रा धुरी, तृप्ती धुरी, सृष्टी धुरी, चंदना धुरी आदींसह पिरावाडी ग्रामस्थ उपस्थित होते. आचरा-पिरावाडी किनाऱ्यावर दोन महिन्यांपूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडली होती. ती अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली समुद्र किनारी संरक्षित करून ठेवली होती. आज सकाळपासून संरक्षित अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात झाली. आचरा ते तोंडवळी या समुद्र किनारी भागात कासव मोठ्या संख्येने दाखल होतात. ऑलिव्ह रिडलेमुळे या किनाऱ्यास पर्यटक पसंती देताना दिसत आहेत. तळाशील ते आचरा हा कासवांच्या अंडी घालण्याचा किनारा म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जाऊ लागला आहे. या भागातील ग्रामस्थ अंडी न पळवता जतन करत अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून त्यांचे जतन करतात. दोन महिन्यानंतर पिल्ले बाहेर पडली की त्यांना वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सोडण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com