राजापूर-सोलगाव स्कूलमध्ये रंगला काव्यकट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-सोलगाव स्कूलमध्ये रंगला काव्यकट्टा
राजापूर-सोलगाव स्कूलमध्ये रंगला काव्यकट्टा

राजापूर-सोलगाव स्कूलमध्ये रंगला काव्यकट्टा

sakal_logo
By

rat27p22.jpg
78547
राजापूरः काव्यकट्टा कार्यक्रमामध्ये कविता सादर करताना प्रा. संतोष जोईल.
----
सोलगाव स्कूलमध्ये रंगला काव्यकट्टा
राजापूर, ता. २८ ः तालुक्यातील सोलगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रा. संतोष जोईल यांचा ‘काव्यकट्टा’ कार्यक्रम रंगला. प्रेम कवितेसह आयुष्य जगण्याची नवी उमेद निर्माण करणारी ‘उमेद’ कवितेचे सादरीकरण करताना त्यांनी ‘काय सायबा काय म्हणत आमच्या कोकणात काय असता’ या मालवणी कवितेच्या माध्यमातून अवघ्या कोकणचा सर्वांगीण खजिना साऱ्यांसमोर मांडला.

या वेळी गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, प्रकाशयात्री संस्थेचे अध्यक्ष प्रा. विनोद मिरगुले, बी. के. गोंडाळ, मुख्याध्यापक दिनेश चौगुले, शिक्षक प्रसाद गुरव, अरविंद जाधव, प्रसाद म्हाडदळकर, अजित गुरव आदी उपस्थित होते. दोन तास रंगलेल्या या कार्यक्रमाचा आरंभ प्रा. जोईल यांनी ‘शाळेत असताना मीही पडलो एकदा प्रेमात’ या कवितेच्या सादरीकरणाने केली. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शालेय जीवनामध्ये फुललेल्या प्रेमाचे सादरीकरण केले. शालेय जीवनातील घडामोडी सांगताना त्यांनी साऱ्‍यांसमोर सरलेले शालेय जीवनच उभे केले. त्यानंतर, ‘स्वार्थी मन’ या कवितेच्या माध्यमातून मानवी मनाची घुसमट साऱ्यांसमोर मांडली. मनाची घुसमट किती भयानक आणि नकोशी असते हे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी अधोरेखित केली. शरीराने अपंग असलो तरी मनाने खंबीर आहे हे अपंग विद्यार्थ्यांचे मनोबल आणि व्यक्तीमत्व उभे करणारी उमेद ही कविता सादर केली. प्रा. जोईल यांनी ‘काहीच सहन होत नाही’ हा आपला काव्यसंग्रह प्रशालेला भेट दिला.