
पावसच्या नवलादेवी मंदिराचा 2 फेब्रुवारीला कलशारोण
rat२७४७ .txt
बातमी क्र. ४७ (पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat२७p३२.jpg-
७८६३२
पावस ः ग्रामदेवता नवलादेवी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे.
--
पावसच्या नवलादेवी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण
गुरूवारी कलशारोण ; विविध कार्यक्रमाचे आयोजन
पावस, ता. २८ ः पावस गावची ग्रामदेवता श्री नवलादेवी मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण झाला आहे. मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम परम पूज्य उल्हासगिरी महाराजांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. त्यानिमित्त १ ते ३ फेब्रुवारी यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
१ फेब्रुवारीला सकाळी ८ ते १२ या वेळेत शांतीचा धार्मिक कार्यक्रम, रुपे लावणे, दुपारी २ ते ३ अभिजित सडकर यांचे सुस्वर भजन, ३ ते ५.३० वाजता दुर्गामाता महिला मंडळाचे भजन, दुपारी ३ ते ५.३० वा. हळदीकुंकू समारंभ आणि बहुरंगी नमन १० वाजता होईल. २ फेब्रुवारीला सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत पावस परशुराम मंदिर ते नवलादेवी मंदिर यादरम्यान कलशाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १ ते ३ या कालावधीत महाप्रसाद होईल. रात्री १० वाजता पती सगळे उचापती हे दोन अंकी विनोदी नाटक होईल.
३ फेब्रुवारीला सकाळी राजापूर तालुक्यातील ओणी येथील गगनगिरी महाराजांच्या मठाचे मठाधिपती परमपूज्य उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहणा कार्यक्रम होणार आहे. ३ फेब्रुवारीला सकाळी ७.३० ते ९ वा. कलश कार्यक्रम, सकाळी १० ते १०.३० वा. प. पुज्य उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा होईल. त्यानंतर ब्रह्मनाद ढोलवादन आणि महाप्रसाद होईल. सायंकाळी भजने,
रात्री १० वाजता कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाने धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री नवलादेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.