निवतीत विविध धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवतीत विविध धार्मिक कार्यक्रम
निवतीत विविध धार्मिक कार्यक्रम

निवतीत विविध धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

निवतीत विविध धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः निवती-खालची शेळपी येथील वटसावित्री माता मंदिराचा आठवा वर्धापन दिन व शिखर कलशारोहण समारंभ २९ व ३० जानेवारीला साजरा होत आहे. उद्या (ता. २९) सकाळी ८ ते ९ पुण्याहवाचन व देवतांना आमंत्रित करणे, ९ ते १.३० कलश पूजन, देवता स्थापना, कलशारोहण, होमहवन, बलिदान, आरती, दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५.३० ते ७ फुगड्या, ७ ते ८.३० ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता चिंतामणी सामंत यांचे कीर्तन, ३० ला सकाळी ९ ते १० देवीवर अभिषेक, १० ते १ महापूजा, दुपारी १ ते १.३० वा. महाआरती, तीर्थप्रसाद, १.३० ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ ओटी भरणे व हळदीकुंकू समारंभ, ५.३० ते ७ फुगड्या, सायंकाळी ७ ते ८ गणेश महिला भजन मंडळ, निवती यांचे भजन, रात्री ८ ते ११ ते ग्रामस्थांची भजने होतील. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवी वटसावित्री ग्रामस्थ मंडळ, खालची शेळपी यांनी केले आहे.
----------------
कुडाळला आज कवी संमेलन
कुडाळ ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेने जिल्हास्तरीय निवडक कवींचे ‘भाकरी आणि फूल’ हे कवी संमेलन व कार्यकर्ता मेळावा उद्या (ता. २९) येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे सकाळी दहा ते दुपारी दोन दरम्यान आयोजित केला आहे. जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या उद्‍घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ शाखाध्यक्षा वृंदा कांबळी आहेत. प्रमुख पाहुणे मालवण शाखाध्यक्ष सुरेश ठाकूर उपस्थित राहणार आहेत. कवी रुजारिओ पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाकरी आणि फूल’ हे कवीसंमेलन होईल.