स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा
स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा

स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा

sakal_logo
By

78704
नेरुर ः मुंबई आयडीयल इंग्लिश मीडियम स्कूल, नेरुर शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. (छायाचित्र ः अजय सावंत)

स्पर्धात्मक युगात आव्हाने स्वीकारा

अविनाश तळेकर ः आयडीयल इंग्लिश मीडियमचे स्नेहसंमेलन

कुडाळ, ता. २८ ः स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारून यशस्वी वाटचाल करावी. जिद्द, चिकाटी, मेहनतीला आत्मविश्वासाची जोड देऊन प्रगती साधावी, असे प्रतिपादन कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी अविनाश तळेकर यांनी केले.
नेरुर समृद्धी प्रतिष्ठान, मुंबई आयडीयल इंग्लिश मीडियम स्कूल, नेरुर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. यावेळी कुडाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. जे. शिरहट्टी, डॉ. नंदा तळेकर, सुरेश चव्हाण, मयेकर, रचना नेरुरकर, संदीप प्रभू, सरपंच भक्ती घाडी, मुख्याध्यापिका वेदिका परब, पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा धनश्री सारंग, राधिका साऊळ, आरोही तारी, हेमंत वालावलकर, रतन साळसकर, रिया कोचरेकर, मधुश्री नाईक, वासुदेव साऊळ, अनन्या हडकर, श्रद्धा गोसावी, शालिनी चव्हाण, धनश्री मेस्त्री, पूनम नेरुरकर, कीर्ती भोगटे आदी उपस्थित होते.
तळेकर म्हणाले की, ‘‘आताचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. भविष्यात वाटचाल करताना ध्येय आताच निश्चित करा. पालकांनी मुलांची आवड ओळखून त्यांना त्या त्या क्षेत्राकडे वळविले पाहिजे. शिक्षणासह कलाक्षेत्रही महत्त्वाचे आहे. अभ्यास करतानाच एखाद्याला कलाक्षेत्रात रुची असेल, तर त्याच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पालकांनी वाटचाल करावी.’’ शिरहट्टी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. नीलम मेस्त्री यांनी सूत्रसंचालन केले. वेदिका परब यांनी अहवाल वाचन केले. चैतन्या चव्हाण यांनी आभार मानले.
..............
चौकट
चिमुकल्यांनी जिंकली मने
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने चिमुकल्यांचे विविधांगी कार्यक्रम झाले. गणेश वंदना, कोळी गीत, लावणी, समूह नृत्य, देशभक्तिपर गीते आदी विविध गीतांवर चिमुकल्यानी बहारदार नृत्याविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली.