खारेपाटण श्रीदेव कालभैरव मंदिरात रंगला वार्षिकोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारेपाटण श्रीदेव कालभैरव 
मंदिरात रंगला वार्षिकोत्सव
खारेपाटण श्रीदेव कालभैरव मंदिरात रंगला वार्षिकोत्सव

खारेपाटण श्रीदेव कालभैरव मंदिरात रंगला वार्षिकोत्सव

sakal_logo
By

78713
खारेपाटण : येथील श्रीदेव कालभैरव मंदिरात वार्षिक उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा झाला. (छायाचित्र : रमेश जामसंडेकर)

खारेपाटण श्रीदेव कालभैरव
मंदिरात रंगला वार्षिकोत्सव
खारेपाटण, ता.२८ : येथील ७२ खेड्यांचा अधिपती असलेल्‍या श्रीदेव काल भैरवाचा वार्षिक उत्सव आणि वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यावेळी हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहात देवदर्शन घेतले, तर पारंपरिक पद्धतीने देवाची पालखी निघाली. हा सोहळा तब्बल पाच तास चालला.
श्रीदेव कालभैरव जत्रोत्सवासाठी तळकोकणातून मोठ्या संस्थेने भाविक उपस्थित होते. या उत्सवात श्रीदेवाची पालखी खांद्यावर घेऊन भाविक पालखीचे भोई होण्याचा मान अनेक भाविकांनी घेतला. मशाली पेटवून पालखीच्या पुढे ढोलताशांचा गजरात, वाजंत्री चौघड्यांच्या तालात काल भैरवाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीचा सोहळा पहाटेपर्यंत सुरू होता. दोन दिवस सुरू असलेल्‍या सोहळ्यात पहिल्‍या दिवशी धार्मिक कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी विविध मंडळांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. या कार्यक्रमासाठी चाकरमान्यांचीही मोठी उपस्थिती होती.