
एसपीके महाविद्यालयात आधुनिक संगणक लॅब
78719
सावंतवाडी ः आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन करताना शुभदादेवी भोसले.
एसपीके महाविद्यालयात
आधुनिक संगणक लॅब
सावंतवाडी, ता. २८ ः येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात ३२ संगणक असलेली आधुनिक संगणक लॅब सुरू करण्यात आली. या लॅबचे उद्घाटन संस्थेच्या कार्याध्यक्षा शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागासाठी ही लॅब चालविली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी शुभदादेवी भोसले यांनी केले. यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोसले, सदस्य जयप्रकाश सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल, डॉ. बी. एन. हिरामणी, संगणक शास्त्र विभागप्रमुख विभा गवंडे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख अक्षता गोडकर, प्रा. एस. एस. नाईक, प्रा. आदित्य वर्दम, प्रा. सूरज सावंत, प्रा. प्रनाम कांबळी, प्रा. तन्वी शिंदे, सिद्धिविनायक सावंत तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन कॉम्प्युटर लॅबमध्ये ३२ कॉम्प्युटर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.