Fri, March 31, 2023

वाळूच्या तीन डंपरवर
नांदरुखमध्ये कारवाई
वाळूच्या तीन डंपरवर नांदरुखमध्ये कारवाई
Published on : 28 January 2023, 11:53 am
78722
नांदरुख ः ‘महसूल’ने पकडलेला वाळूवाहू डंपर.
वाळूच्या तीन डंपरवर
नांदरुखमध्ये कारवाई
मालवण, ता. २८ : येथील तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने आज पहाटे धडक कारवाई करताना अनधिकृत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर नांदरुख मार्गावर पकडले. तिन्ही डंपर तहसील कार्यालय परिसरात नेण्यात आले. दरम्यान, मालवण-कुपेरीच्या घाटी येथे मालवणच्या दिशेने विनापरवाना खडीची वाहतूक करणारा डंपर तहसीलदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल (ता. २७) रात्री पकडला. दुपारचा पास आहे तसेच वाहन नादुरुस्त असल्याचे चालकाने सांगितले; मात्र त्यानंतर डंपर पळवून नेला. त्यामुळे त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले.