धामापूर नळपाणी योजनेची निविदा प्रक्रिया नव्याने करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामापूर नळपाणी योजनेची
निविदा प्रक्रिया नव्याने करा
धामापूर नळपाणी योजनेची निविदा प्रक्रिया नव्याने करा

धामापूर नळपाणी योजनेची निविदा प्रक्रिया नव्याने करा

sakal_logo
By

06311
नीलेश राणे

धामापूर नळपाणी योजनेची
निविदा प्रक्रिया नव्याने करा

नीलेश राणे ः प्रशासनाकडे मागणी

मालवण, ता. २८ : येथील पालिकेच्या सुमारे ४० कोटी रकमेचे धामापूर नळपाणी योजनेचे काम शासनाने मंजूर केले आहे. या कामाची निविदा मालवण पालिकेने मागील महिन्यात मागविली आहे. मिळालेल्या तक्रारीनुसार ही निविदा मॅनेज केल्याची चर्चा असून त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया करण्याची मागणी भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
अधिकाऱ्यांचे काही ठराविक कंत्राटदारांसोबत आर्थिक व्यवहार झाले आहेत; अशी देखील चर्चा आहे. ई-निविदा प्रणाली असूनही नळपाणी योजनेचे काम बोगस कंत्राटदाराकडून करून घेण्याचे कट कारस्थान काही राजकीय व शासकीय लोकांनी केले असल्याचे दिसत आहे. असे झाल्यास नळपाणी योजनेचे ४० कोटी पाण्यात जातील आणि सर्वसामान्य जनतेला भविष्यात त्रास भोगावा लागेल. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची योग्य प्रकारे चौकशी करून सदोष निविदा रद्द करावी व पारदर्शक प्रक्रियेनुसार करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा; अन्यथा भाजपतर्फे तीव्र भूमिका घेतली जाईल, असे पत्र राणे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना पाठविले आहे.