
नीतेश मयेकरांना राष्ट्रीय पुरस्कार
78735
वेंगुर्ले : नीतेश मयेकर यांना पुरस्कार प्रदान करताना श्रीनिवास मुडगेरीकर, दीपक पाटील व इतर.
नीतेश मयेकरांना राष्ट्रीय पुरस्कार
वेंगुर्ले ः कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कोकण विभागात तालुक्यातील कृषी सेवा केंद्राचे नीतेश मयेकर यांचा राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स कंपनीमार्फत विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. देशातून एकूण ५७ जणांना हा पुरस्कार प्राप्त झाला. त्यामध्ये कोकणातून मयेकर यांचा समावेश आहे. मयेकर यांनी ''अॅग्रोटेक''च्या या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा होत असलेला अतिरिक्त वापर, ठिबक आणि तुषार सिंचनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायजर्स ही देशातील सर्वात मोठी खत कंपनी आहे. हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मयेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुंबई येथे आरसीएफ कंपनीचे चेअरमन श्रीनिवास मुडगेरीकर, कोकण विभागाचे दीपक पाटील, गोवेकर व मार्गदर्शक वराडकर आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
...................
वेंगुर्लेत १७ फेब्रुवारीला वक्तृत्व स्पर्धा
वेंगुर्ले ः बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामार्फत ग्रंथालय उपक्रमांतर्गत शिवजयंतीचे औचित्य साधून १७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दहावीपर्यंतचा शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये होणार आहे. शालेय गटासाठी ‘राजमाता जिजाऊ ः एक अलौकिक व्यक्तिमत्व’ व खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ः स्वराज्याची गरज’ हे विषय आहेत. शालेय गटासाठी किमान पाच ते सात मिनिटे, तर खुल्या गटासाठी किमान आठ ते दहा मिनिटे वेळ आहे. शालेय गटातील विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५००, ३०० रुपयांची दोन, तर खुल्या गटासाठी १५००, ११००, ७५० व ५०० रुपयांची दोन अशी बक्षिसे आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. इच्छुकांनी संजय पाटील व सुनील आळवे यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी केले आहे.