तुळस हायस्कूलमध्ये हस्ताक्षर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुळस हायस्कूलमध्ये हस्ताक्षर कार्यशाळा
तुळस हायस्कूलमध्ये हस्ताक्षर कार्यशाळा

तुळस हायस्कूलमध्ये हस्ताक्षर कार्यशाळा

sakal_logo
By

78739
तुळस ः हस्ताक्षर कार्यशाळेचे उद्‌घाटन सगुण माळकर यांनी केले.

तुळस हायस्कूलमध्ये हस्ताक्षर कार्यशाळा
वेंगुर्ले ः मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस यांच्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल, तुळस येथे शालेय मुलांच्या हस्ताक्षर सुधार कार्यशाळेचे आयोजन केले होते. नेमळे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक व भाषातज्ज्ञ विकास गोवेकर यांनी हस्ताक्षर सुधारण्याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. मात्रा, वळण, वेग, अंतर, वेलांटी आदींवर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना हस्ताक्षर कसे असावे आणि त्यासाठी तंत्र काय असावे, याविषयी माहिती दिली. हस्ताक्षर कार्यशाळेचे उद्‌घाटन वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विकास गोवेकर, वाचनालय खजिनदार प्रकाश परब, प्रा. सचिन परुळकर, सुजाता पडवळ, संजय पाटील आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या अनुषंगाने सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. त्यात सुरुची मराठे, सोनल मराठे, पुष्कर पेडणेकर यांनी प्रथम तीन, तर हर्षदा होडावडेकर व अनुष्क अडके यांनी उत्तेजनार्थ यांनी यश मिळविले. त्यांना वाचनालयामार्फत मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.