संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat२८१४.txt

बातमी क्र..१४ (पान ५ साठी)
(टीप-जाहिरातदार आहेत)

फोटो ओळी
- ratchl२८३.jpg ः
७८७५७
चिपळूण ः स्क्वॅश स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मंदार एज्युकेशन सोसायटीच्या व्हा. चेअरमन शैलजा शिंदे.
-------

शिंदे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश

चिपळूण ः महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक पुणा क्लब, पुणे येथे स्क्वॅश स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात ठाण्याची एशियन गेम्स रौप्य पदक विजेती उर्वशी जोशी (शिवछत्रपती पुरस्कार ) व नामांकित मॉस्को स्क्वॅश ओपन स्पर्धेत रौप्य पदक विजेता राहुल बैठा यांच्याबरोबर अंतीम सामना झाला. या सामन्यात मंदार एज्युकेशन सोसायटीचे सौ. शैलजा शिंदे आर्टस् सायन्स आणि कॉमर्स ज्युनिअर व सीनिअर कॉलेजची विद्यार्थिनी सेजल सुनील कदम व क्रिश संदीप कलकुटकी यांनी रौप्यपदक पटकावले. त्यांच्या यशाबद्दल मंदार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंदार शिंदे, व्हा. चेअरमन शैलजा शिंदे, संस्थेचे सीईओ व सचिव डॉ. विलास सावंत तसेच संस्थेच्या विश्वस्त व लेफ्टनंट शशिकांत गावडे अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वेदांती सावंत यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. रांजणे, क्रीडाशिक्षक प्रा. चौगुले, प्रा. तपकीरे, प्रा. कदम, प्रा. भोसले आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
--
दापोली विद्यापीठ मैदानावर क्रीडा महोत्सव

गावतळे ः जिल्हा परिषद रत्नागिरी आणि पंचायत समिती दापोली पुरस्कृत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १ व २ फेब्रुवारीला के .के. व्ही. मैदानावर क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या संदर्भात नियोजन आणि प्रशिक्षण कार्यक्रम झाला. दोन वर्षाच्या कोरोना महामारीत मोबाईलमध्ये हरवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने मन आणि मेंदुच्या विकासासाठी अनेक स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जात आहेत; परंतु मनगटाच्या विकासासाठी शारीरिक विकास होण्याकरिता यंदा पुन्हा एकदा जि. प. शाळांमध्ये शिकणाऱ्‍या मुलांचा तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आयोजित केला असल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले. १ फेब्रुवारीला मुलांचा सांघिक आणि मुली वैयक्तिक व लंगडी तर त्याच दिवशी दुपारनंतर बक्षिस वितरण तसेच दुसऱ्‍या दिवशी मुली सांघिक आणि मुलांचा वैयक्तिक व क्रिकेट अशा स्पर्धांचे आयोजन केले. यामध्ये खेळाचे बदलते स्वरूप व नियमावली यांचे प्रशिक्षक पंच नितीन बांद्रे आणि वैभव बोरकर यांनी कबड्डी तर नामदेव फल्ले यांनी खो-खो खेळांचे सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. तालुक्यातील ६ प्रभांगामधून निवडक विद्यार्थी तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत सहभाग घेणार असून, प्रत्येक प्रभागात जोरदार तयारी दिसून येत आहे.
--