वक्तृत्व स्पर्धेत शुभम निकम विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वक्तृत्व स्पर्धेत शुभम निकम विजेता
वक्तृत्व स्पर्धेत शुभम निकम विजेता

वक्तृत्व स्पर्धेत शुभम निकम विजेता

sakal_logo
By

rat२८p११.jpg-
७८७५१
रत्नागिरी : श्रीमान भागोजीशेठ कीर चषक पहिल्या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा विजेता शुभम निकम याला बक्षीस देताना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, शिल्पा पटवर्धन. सोबत सतिश शेवडे, अॅड. विजय साखळकर आदी.
------------
आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व
स्पर्धेत शुभम निकम विजेता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्रीमान भागोजीशेठ कीर चषक पहिली आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. यात लातूरच्या महात्मा बसवेश्‍वर कॉलेजच्या शुभम निकम याने प्रथम क्रमांक पटकावला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन श्रीमान भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्‍वस्त अ‍ॅड. विनय आंबुलकर यांच्या हस्ते झाले. राज्यातील विविध महाविद्यालयातून ४० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सहकार्याध्यक्ष अ‍ॅड. विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, नियामक मंडळ सदस्य आनंद देसाई, श्रीमान भागोजीशेठ कीर ट्रस्टचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य अ‍ॅड. विनयकुमार पावसकर, विद्यमान प्र. प्राचार्या अ‍ॅड. तृप्ती देवरुखकर, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते.
प्रमुख अतिथींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह म्हणून चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी समाजासमोरील सध्याची आव्हाने आणि भारतातील राजकारणात नवीन तरुण चेहर्‍यांची गरज असे विषय ठेवण्यात आले होते. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. महाविद्यालयाच्या प्रा. रोहित देव, प्रा. संयोगिता सासने, प्रा. आशिष बर्वे, प्रा. चिंतामणी काळे, प्रा. स्मिता कांबळे, प्रा. कस्तुरी कदम, प्रा. सुप्रिया भाटवडेकर, प्रा. गौरी देसाई, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या स्पर्धेचे नियोजन उत्तमरित्या सांभाळले. सूत्रसंचालन प्रा. नूतन परांजपे आणि प्रा. रोहित देव यांनी केले.
-----------
चौकट
विजेत्यांची नावे
प्रथम- शुभम निकम (महात्मा बसवेश्‍वर कॉलेज, लातूर, ११ हजार रुपये), द्वितीय- अभिषेक नेमाणे (के. जी. जोशी बेडेकर कॉलेज, ठाणे, ७ हजार रुपये), तृतीय- चैतन्य कांबळे (कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी, ५ हजार रुपये), उत्तेजनार्थ- संकेत पाटील (शिवराज कॉलेज, कोल्हापूर), यश पाटील (बी.के.बिर्ला कॉलेज, मुंबई), बसेरा जमादार (विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर).