
१०८ सूर्यनमस्कार शिबिरास बांदा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
78766
बांदा ः सूर्यनमस्कार शिबिराचे उद्घाटन करताना पोलिस निरीक्षक शामराव काळे. सोबत प्रमोद कामत आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
१०८ सूर्यनमस्कार शिबिरास
बांदा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद
बांदा, ता. २८ ः पतंजली योग समिती बांदा आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या भव्य पटांगणावर आज १०८ सूर्यनमस्कार शिबिर झाले. आंतरराष्ट्रीय सूर्यनमस्कार दिन अर्थात रथसप्तमीचे औचित्य साधून या शिबिराचे आयोजन केले होते.
बांदा पोलिस निरीक्षक श्यामराव काळे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण तथा आरोग्य सभापती प्रमोद कामत होते. यावेळी पतंजली योग समिती सिंधुदुर्गचे सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर, सरपंच प्रियंका नाईक, व्ही. एन. नाबर प्रशाळेच्या मुख्याध्यापक मनाली देसाई, भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी महेश भाट, किसान सेवा समिती जिल्हा प्रभारी सुभाष गोवेकर, लक्ष्मण पावसकर, प्रियंका हरमलकर, दत्तात्रय निखार्गे, उत्तम देसाई, प्रेमानंद देसाई, अभिलाष देसाई आदी उपस्थित होते. शेखर बांदेकर यांनी १०८ सूर्यनमस्कारचे शिबिर घेतले. या शिबिरास पतंजली योग समिती बांदा आणि पतंजली योगसमिती डेगवेचे सर्व साधक उपस्थित होते. तसेच खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, व्ही. एन. नाबर स्कूल आणि बांदा केंद्रशाळा नंबर १ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापकांनी स्टेज, साउंड सिस्टीम आणि जागा मोफत उपलब्ध करून दिली. योगाभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रमोद कामत यांनी सांगितले.