चिपळूण ः नारायण तलावास मिळणार नवी झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  नारायण तलावास मिळणार नवी झळाळी
चिपळूण ः नारायण तलावास मिळणार नवी झळाळी

चिपळूण ः नारायण तलावास मिळणार नवी झळाळी

sakal_logo
By

RATCHL286.JPG
78775
चिपळूणः शहरातील नारायण तलाव परिसरातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
----------------
नारायण तलावास येणार नवी झळाळी
सव्वातीन कोटीचा खर्च; गाळ काढण्याच्या कामाला सुरवात
चिपळूण, ता. २८ः गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या शहरातील नारायण तलावाच्या सुशोभीकरणाला आता वेग आला आहे. सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्चातून हे काम केले जात आहे. लवकरच या तलावाला वेगळा लूक येणार असून, नवीन झळाळी मिळण्यास मदत होणार आहे.
पूर्वीच्या ६०हून अधिक तलावांपैकी आता शहरात केवळ नारायण तलाव, विरेश्वर व रामतीर्थ हे तीनच तलाव अस्तित्वात आहेत. उर्वरित तलाव बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या मर्जीनुसार भराव करून नष्ट करत त्यावर भव्य इमारती उभारल्या आहेत. काही शासकीय इमारती, उद्याने व मैदानेदेखील तलावाच्या जागेतच उभारण्यात आले. त्यामुळे चिपळूणची वेगळी ओळख पुसट होत चालली आहे. अशा स्थितीत अस्तित्वात असलेल्या तीन तलावांच्या सुशोभीकरणातून चिपळूणची ही ओळख जपण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता कोट्यवधीचा निधी त्या त्या तलावावर खर्च केला जात आहे. रामतीर्थ तलाव व विरेश्वर तलावावर या आधी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. त्यानंतर आता नारायण तलाव सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. तलाव परिसराची स्वच्छता, भराव, संरक्षण भिंत, गाळ काढणे, प्रवेशद्वार, सुशोभीकरण आदी महत्वाची काम आता केली जात आहेत.
काही दिवसांपूर्वीच या कामाला सुरवात झाली. सद्यःस्थितीत तलावातील पाणी काढून तलाव पूर्ण रिकामे केला जात असून त्यातील गाळ काढण्याचे काम केले जात आहे. त्यानंतर अंतर्गत भागातील संरक्षक भिंत उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणे ठेकेदार कंपनीने तयारी केले आहे. या निमित्ताने हा तलाव काही प्रमाणात रूंदही केला जात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या तलावाला लवकरच नवा लूक येणार आहे.