Tue, March 21, 2023

वक्तृत्व स्पर्धेत शुभम निकम विजेता
वक्तृत्व स्पर्धेत शुभम निकम विजेता
Published on : 28 January 2023, 2:11 am
वक्तृत्व स्पर्धेत शुभम निकम विजेता
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने श्रीमान भागोजीशेठ कीर चषक पहिली आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. यात लातूरच्या महात्मा बसवेश्वर कॉलेजच्या शुभम निकम याने प्रथम क्रमांक पटकावला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात स्पर्धेचे उद्घाटन श्रीमान भागोजीशेठ कीर ट्रस्टचे विश्वस्त अॅड. विनय आंबुलकर यांच्या हस्ते झाले. राज्यातील विविध महाविद्यालयातून ४० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.