सिंधुदुर्ग महाविद्यालयात सत्कार सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग महाविद्यालयात सत्कार सोहळा
सिंधुदुर्ग महाविद्यालयात सत्कार सोहळा

सिंधुदुर्ग महाविद्यालयात सत्कार सोहळा

sakal_logo
By

78808
मालवण ः सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसी विभागातर्फे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

सिंधुदुर्ग महाविद्यालयात सत्कार सोहळा

प्राध्यापक, कर्मचारी, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : येथील सिंधुदुर्ग महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त निवृत्त होणाऱ्या प्राध्यापक व अधीक्षक यांचा राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.
यावेळी एनसीसी विभागातर्फे प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी निवृत्त होणारे प्रा. बी. एच. चौगुले व अधीक्षक ए. डी. कदम यांचा सन्मान केला. गेल्या काही वर्षांमध्ये प्रा. लेफ्टनंट डॉ. खोत यांनी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनसीसी विभागामार्फत सन्मान देण्याची पद्धत सुरू केली आहे. हा सन्मान १५ ऑगस्ट व २६ जानेवारी रोजी होतो. सन्मानाने कार्यालयातून त्यांना स्टेजवर पायलटिंग करत घेऊन जाण्यात येते व त्या ठिकाणी सन्मानपूर्वक सत्कार करण्यात येतो. एनसीसीमध्ये चांगली कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. यामध्ये सिनिअर अंडर ऑफिसर प्रीती बांदल, तेजस पोळ, ज्युनिअर अंडर ऑफिसर नारायण मुंबरकर, पूर्वा कोयंडे, कार्टर मास्टर मिथील मोर्वेकर, तृप्ती माडये, कार्पोरल आणि सार्जंट अक्षता आचरेकर, अर्जुन मालवणकर, बिरू खरात, गोपाळ कावले अशा दहा विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. फिटनेस ग्रुप, मालवणतर्फे डॉ. गार्गी ओरसकर यांच्याकडून एनसीसी कॅडेट तेजस पोळ, डॉ .शुभांगी जोशी यांच्याकडून एनसीसी कॅडेट पूर्वा कोयंडे, तर डॉ. माळी यांच्याकडून विनीत मंडलिक याला चांगला फिटनेस ठेवल्याबद्दल बक्षीस देण्यात आले.