जिल्ह्यात आज पाचवी शिष्यवृत्ती सराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आज पाचवी शिष्यवृत्ती सराव
जिल्ह्यात आज पाचवी शिष्यवृत्ती सराव

जिल्ह्यात आज पाचवी शिष्यवृत्ती सराव

sakal_logo
By

जिल्ह्यात आज पाचवी शिष्यवृत्ती सराव
एकूण १२० केंद्रेः २०८२ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३०ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय पाचवी शिष्यवृत्ती मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन उद्या (ता. ३१) केले आहे. जिल्ह्यात १२० परीक्षा केंद्रांवर २०८२ विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या परीक्षेला मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी लेखी परवानगी दिली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखेकडून दिली आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक विभागातील पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा सराव होण्यासाठी दरवर्षी शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करते. उद्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांत मिळून १२० परीक्षा केंद्रांवर २०८२ विद्यार्थी या सराव परीक्षेचा लाभ घेणार आहेत. यामध्ये कुडाळ २३ केंद्रे व ३९० विद्यार्थी, सावंतवाडी २० केंद्रे व ४३२ विद्यार्थी, वेंगुर्ले १४ केंद्रे व २५२ विद्यार्थी, देवगड १९ केंद्रे व २३१ विद्यार्थी, कणकवली २२ केंद्रे व २७२ विद्यार्थी, मालवण १५ केंद्रे व १९९ विद्यार्थी, वैभववाडी ३ केंद्रे व १३५ विद्यार्थी, दोडामार्ग ४ केंद्रे व १७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सराव परीक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी मालवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संतोष नेरकर, विलास सरनाईक, प्रवीण कुबल, श्रध्दा वाळके आदींनी सहकार्य केले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी या शैक्षणिक उपक्रमास शिक्षक आमदार निवडणुकीच्या आचारसंहितेचे पालन करून परीक्षा घेण्यास लेखी परवानगी दिली असून याबाबत शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. या सराव परीक्षेस जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पाचवी शिष्यवृत्ती परीक्षार्थींनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांनी केले आहे.