नेत्र चिकित्सा शिबिरास कोळोशी येथे प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेत्र चिकित्सा शिबिरास कोळोशी येथे प्रतिसाद
नेत्र चिकित्सा शिबिरास कोळोशी येथे प्रतिसाद

नेत्र चिकित्सा शिबिरास कोळोशी येथे प्रतिसाद

sakal_logo
By

swt३०३.jpg
७९१५८
कोळोशीः नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर.

नेत्र चिकित्सा शिबिरास
कोळोशी येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ३० ः गजानन विकास मित्रमंडळ कोळोशी-मधलीवाडी यांच्या वतीने कोळोशी गणेश मंदिर येथे गणेश जयंतीनिमित्त दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिरास परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उत्सवाचे हे १५ वे वर्ष होते. मंगळवारी (ता. २४) सकाळी नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन करून या सोहळ्याला सुरुवात होणार झाली. दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकू व फनीगेम्स, सायंकाळी मुलांसाठी रंगभरण चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा, रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यामधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर बुधवारी (ता. २५) सकाळी काकड आरती, धार्मिक कार्यक्रम, महाआरती, मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ, दुपारी तीर्थप्रसाद व महाप्रसाद वाटप, सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक, महाआरती व भजन, रात्री लकी ड्रॉ सोडत, पैठणी वितरण व बक्षीस समारंभ झाला. त्यानंतर बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ, कोळंब-भटवाडी मालवण यांचा नाट्यप्रयोग झाला. या नाट्यप्रयोगास रसिकांनी भरभरून दाद दिली. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मित्रमंडळाचे पदाधिकारी, मुंबईकर चाकरमानी, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.