गोंधळी यांची तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोंधळी यांची तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या..
गोंधळी यांची तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या..

गोंधळी यांची तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या..

sakal_logo
By

rat3015.txt

( टुडे पान 3 मेनशेजारी घेणे)

गोंधळी यांची तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या..

सरपंच नंदू कदम ; बक्षिसपत्रे न घेता काम का केले?

देवरूख, ता. 30 ः हातिव गावातील जलमिशन योजनेचे काम नियमात सुरू असून माजी सरपंच विलास गोंधळी यांची तक्रार म्हणजे चोराच्या उलट्या असा प्रकार असल्याचा दावा सरपंच नंदू कदम यांनी केला आहे.
हातिव गावात 2006-07 ला झालेल्या जलस्वराज्य योजनेच्या माध्यमातून झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम करताना त्या वेळच्या सरपंच व जलस्वराज्य कमिटीने ज्या जागेत आड व टाकी बांधकाम करताना जमीनमालक सुरेश कदम व अशोक कदम यांची बक्षिसपत्रे न घेता काम का केले ? त्याकडे 15 वर्षे दुर्लक्ष करणाऱ्या व नियमबाह्य कामाबाबत तत्कालीन सरपंचावर कारवाई का झालीनाही? असा सवाल विद्यमाने सरपंच नंदू कदम यांनी पत्रकारांशी बोलताना करून माजी सरपंच विलास गोंधळी यांचे आरोप खोडून काढले. सध्या गावातील जलजीवन मिशनचे काम हे बक्षिसपत्रे करून घेण्याचे सुरू असून जागामालकांनी प्रत्येक ग्रामसभेत ते काम करण्यास ग्रा. पं. ला संमतीपत्रे दिल्यानेच कामे सुरू आहेत, असा दावा सरपंच कदम यांनी केला.

बी झोनमध्ये एप्रिलमध्ये पाणीपुरवठा कमी होत असल्याने जनतेला ऐन उन्हात पाणी कमी पडू नये म्हणूनच जागामालकांच्या संमतीनेच विहीर व टाक्यांची कामे केले असल्याचेही स्पष्ट केले आहे. बक्षिसपत्रे नसतानाही केलेल्या योजना त्या वेळच्या ग्रामपंचायतीने ताब्यात का घेतली? त्या जलस्वराज्य योजनेचा हिशोबही वेळोवेळी मागणी करून अद्यापही दिलेला नाही,असे नंदू कदम यांनी सांगितले.
आता जलजीवन मिशनमधून जे काम चालू आहे त्या प्रत्येक झोनसह गेल्या सहा महिन्याच्या सभेला कोरम पूर्ण असल्यानेच ग्रामसभा झालेल्या आहेत. त्या ग्रामसभेत याची सविस्तर माहिती दिलेली आहे. या सर्व ग्रामसभांना तक्रारदार विलास गोंधळी हे स्वतः हजर आहेत. त्यांच्या सह्याही आहेत असेही कदम यांनी सांगितले.
--------------