
नाट्यरंग कार्यक्रमास सावंतवाडीत प्रतिसाद
swt309.jpg
79172
सावंतवाडीः ‘संगीत नाट्यरंग नाट्य प्रवेश’ कार्यक्रमात सहभागी कलाकार.
नाट्यरंग कार्यक्रमास
सावंतवाडीत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः सुरश्री संगीत विद्यालयाच्या वतीने संगीत नाट्यरंग नाट्य प्रवेश कार्यक्रम सादर करून संगीत नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यात आले. मंजिरी धोपेश्वरकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिग्दर्शक सचिन धोपेश्वरकर यांच्या निर्मितीतून अत्यंत उत्कृष्टपणे संगीत शारदा, संगीत सौभद्र, संगीत मत्स्यगंधा, संगीत मदनाची मंजिरी आदी नाट्य प्रवेश श्री मंगल कार्यालय, भडवाडी येथे सादर करण्यात आले. मंजुश्री कशाळीकर, स्नेहा येरेकर, तनिष्का राणे, चिन्मय वाळके, रेवा पित्रे, वेदा कोळंबेकर, चैताली पाटील, आदिती भाटवडेकर, स्वरांगी मेस्त्री यांनी या नाट्य सादरीकरणात कला कौशल्य दाखवून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रंगभूषा आणि वेशभूषेसाठी स्नेह वझे यांचे सहकार्य लाभले. संगीत साथ तबला नीरज भोसले आणि ऑर्गन मंदार जोशी यांनी देऊन कार्यक्रमात रंगत आणली. गेली अनेक वर्ष सचिन धोकेश्वरकर हे नाट्य क्षेत्रामध्ये कलाकार घडविण्याचे तसेच मंजिरी धोपेश्वर संगीत क्षेत्रामध्ये मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहेत.
...............
ओरोसला पालखी दर्शन सोहळा
सिंधुदुर्गनगरीः माणगाव येथील श्रीमंत परमहंस परिव्रजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांची ओरोस येथील श्री स्वामी नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत ओरोस येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर येथे गुरुवारी (ता. २) सायंकाळी सात ते आठ या कालावधीत पालखी दर्शन सोहळा आयोजित केला आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ओरोस येथील श्री दत्तमंदिराचे पुजारी संतोष ओरोसकर, नागेश ओरोसकर यांनी केले आहे. रात्री आठनंतर दत्त मंदिर माणगाव येथे पालखी प्रस्थान होणार आहे.
..................