
संक्षिप्त
rat३०१९.txt
बातमी क्र..१९
rat३०p१३.jpg ः
७९१५२
साखरपा ः कार्यक्रमात सुरेश तळवलकर, गिरीधर कुलकर्णी आणि रमा कुलकर्णी.
रंगला तस्मै श्री कार्यक्रम
साखरपा ः गिरीधर कुलकर्णी संचलित स्वरूप संगीत विद्यालयाचा गुरूपूजन सोहळा तस्मै श्री नुकताच पार पडला. पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात पंडित सुरेश तळवळकर यांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले. संगीत, स्वर, लय-ताल विचार या विषयी आपले मौल्यवान विचार प्रगट करून पंडितजींनी विद्यार्थ्यांना, पालकांना व श्रोत्यांना मार्गदर्शन केले. कोल्हापूरहून गेली २० वर्षे सातत्याने देवरूखात येऊन अखंड विद्यादान करून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या गिरीधर कुलकर्णी यांच्या कार्याचा पंडितजींनी गौरवपूर्ण उल्लेख केला आणि आशीर्वाद दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन स्वरूप संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत परिश्रमाने व नेटके केले. या संपूर्ण कार्यक्रमात गिरीधर कुलकर्णी, नितीन मुनीश्वर, अमोघ पेंढारकर यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पा आठल्ये यांनी केले. कार्यक्रमास रत्नागिरी देवरूख व पंचक्रोशीतील रसिकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
rat३०p१४.jpg ः
७९१५३
साखरपा :ः मानवी मनोरे सादर करताना विद्यार्थी आणि संस्कृतीदर्शन.
कबनूरकर शाळेत मानवी मनोरे, संस्कृतीदर्शन
साखरपा ः देशाचा ७३वा प्रजासत्ताक दिन कोंडगाव येथील कबनूरकर स्कूलमध्ये विविध कार्यक्रम सादर करून साजरा करण्यात आला. यंदा ध्वजारोहणावेळी मानवी मनोरे आणि विविध वेशभूषेत संस्कृतीदर्शन सादर करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता साधत देशातील विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा सादर केल्या. यात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, काश्मीर, पंजाब, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ, पश्चिम बंगाल आदी राज्यांच्या वेशभूषा सादर करण्यात आल्या. नववीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक मानवी मनोरे सादर केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका लिना कबनूरकर, रमेश ढवळ, महादेव अनावरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने हजर होते.
---
-rat३०p१५.jpg ः
७९१५४
अनुराग पाणिग्रही यांचा सत्कार करताना मान्यवर.
दापोलीत अनुराग पाणिग्रही यांचे व्याख्यान
गावतळे ः सुवर्ण महोत्सवी जिल्हा विज्ञान प्रदर्शनात दापोली शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन गुजर यांच्या अध्यक्षतेत उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, प्रभाकर सनगरे यांच्या उपस्थितीत अनुराग पाणिग्रहींचे व्याख्यान दापोली येथे झाले.
बालपणापासूनच एक ध्येय उराशी बाळगून जे काय शिकायचे ते इतरांना शिकवायचे असा ध्यास घेतलेले अनुराग पाणिग्रह ग्रामीण भागातील युवकांसाठी एक आशास्थान असल्याचे व्याख्याते अनुराग पाणिग्रही यांची ओळख करून देताना शीतल गिम्हवणेकर यांनी सांगितले. प्रभुदेसाई ट्रस्टचे संचालक प्रा. अनुराग पाणिग्रही यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेतून ए लेव्हल अप इन सायन्स या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड आणि डॉ. सचिन गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ए. जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक सतीश जोशी, गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, विज्ञान मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
----
तुळसवडेच्या ग्रामसेवकाचा कार्यभार काढून घेतला
राजापूर ः तुळसवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी तुळसवडेचे उपसरपंच संजय कपाळे यांनी प्रजासत्ताकदिनी छेडलेल्या उपोषणाला यश आले आहे. उपोषणाची दखल घेऊन विद्यमान ग्रामसेवकाकडील ग्रामसेवकपदाचा पदभार काढून त्या ठिकाणचा पदभार अन्य ग्रामसेवकाकडे देण्यात आला आहे. तसे पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी कपाळे यांना दिले आहे.
तुळसवडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांच्या विरोधामध्ये उपसरपंच कपाळे यांनी पंचायत समितीकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यासोबत त्यांनी वरिष्ठ स्तरावरही ग्रामसेवकाच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणारा पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या या मागणीची दखल न घेतल्याने त्यांनी सुमारे ५ महिन्यांपूर्वी पंचायत समितीच्या आवारामध्ये उपोषण आंदोलन केले होते. त्या वेळी त्यांना पंचायत समितीकडून संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करण्याचे आश्वासित केले होते; मात्र, त्यानंतरही संबंधितावर कोणतीही कारवाई न झाल्याने कपाळे यांनी पुन्हा एकदा प्रजासत्ताकदिनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेऊन संबंधित ग्रामसेवकाकडून तुळसवडे ग्रामपंचायतीचा पदभार काढून घेण्यात आला आहे. तशा आशयाचे पत्र पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी कपाळे यांना दिले आहे.
---
rat३०p१७.jpg ः
७९१५५
रत्नागिरी ः खेळाडूंच्या यशाबद्दल कौतुक करताना मंत्री उदय सामंत आणि मान्यवर.
राज्य तायक्वांदो स्पर्धेतील विजेत्यांचे कौतुक
रत्नागिरी ः रत्नागिरीच्या ४ खेळाडूंची राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली होती. एस. आर. के. तायक्वांदो क्लबच्या अमेय सावंत याने सुवर्णपदक मिळवत राष्ट्रीय स्पर्धेतील आपलं स्थान निश्चित केलं तर गणराज तायक्वांदो क्लबची गायत्री शेलार हिला रौप्यपदक मिळालं. मंत्री उदय सामंत यांनी या दोनही खेळाडूंच्या घवघवीत यशाबद्दल कौतुक केलं. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ३२वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २६ ते २८ जानेवारीदरम्यान जिल्हा क्रीडासंकूल जळगाव या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंच्या या यशाबद्दल माजी उपनगराध्यक्ष राजन शेटे तसेच बाबू म्हाप यांनीही दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले. या खेळाडूंना एसारके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष, प्रमुख प्रशिक्षक शाहरूख शेख, गणराज तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष तसेच प्रमुख प्रशिक्षक प्रशांत मकवाना यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
----