कणकवली : भाई बांदल निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : भाई बांदल निधन
कणकवली : भाई बांदल निधन

कणकवली : भाई बांदल निधन

sakal_logo
By

७९२१३

वरवडे माजी सरपंच
प्रभाकर ऊर्फ भाई बांदल यांचे निधन
कणकवली, ता. ३० : तालुक्‍यातील वरवडेचे माजी सरपंच प्रभाकर ऊर्फ भाई सखाराम बांदल (वय ७५, रा. हिवाळेवाडी, वरवडे) यांचे आज सकाळी निधन झाले. श्री. बांदल केंद्र सरकारच्या सीआरपीएफ दलातून अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते. २०१८ ते २०२२ दरम्यान त्यांनी वरवडे गावचे लोकनियुक्त बिनविरोध सरपंच म्हणून यशस्वी कार्यभार सांभाळला होता. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांना छातीत दुखू लागले. डॉक्टरकडे तपासणीसाठी जायची तयारी करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले मात्र तत्पूर्वी त्यांचे निधन झाले होते. माजी पंचायत समिती सदस्या राधिका सावंत यांचे ते वडील तसेच भाजप कणकवली उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांचे सासरे होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे.